शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पारगावच्या ग्रामसेवकासह तिघेजण लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:22 IST

सातारा पालिकेतील टक्केवारीचा पर्दाफाश केल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील टक्केवारीचा पर्दाफाश केला. यामध्ये पारगावच्या ग्रामसेवकासह तिघांना ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील लाचखोरी उफाळून आल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे.

ठळक मुद्देपारगावच्या ग्रामसेवकासह तिघेजण लाचलुचपतच्या जाळ्यातएसीबीची कारवाई ; अनामत रक्कम परत देण्यासाठी ६० हजार स्वीकारले

सातारा : सातारा पालिकेतील टक्केवारीचा पर्दाफाश केल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील टक्केवारीचा पर्दाफाश केला. यामध्ये पारगावच्या ग्रामसेवकासह तिघांना ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील लाचखोरी उफाळून आल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे.भाऊसाहेब गजानन सस्ते (ग्रामसेवक, पारगाव खंडाळा), अंबादास रामराव जोळदापके, (खासगी ठेकेदार, रा. नांदेड सीटी, पुणे) गंगाराम बाबासाहेब भोसले (वय ४९, शाखा अभियंता, पंचायत समिती खंडाळा ) अशी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदाराने पारगाव, ता. खंडाळा येथील बंदिस्त गटाराचे काम केले होते. यासाठी त्यांनी डिपॉझिट ठेवले होते. हे झिपॉझिट आणि कामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक सस्ते याने स्वत:साठी ५ टक्के व शाखा अभियंता भोसले याच्यासाठी ५ टक्के असे एकूण १० टक्के प्रमाणे ६० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने सातारा येथे येऊन लाचलुचपत विभागात लेखी तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या टीमने बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेसमोर सापळा लावला.

ग्रामसेवक भाऊसाहेब सस्ते व शाखा अभियंता भोसले यांनी मोबाईलवरून खासगी ठेकेदार अंबादास जोळदापके (रा. नांदेड सीटी, पुणे) यांच्याकडे पैसे देण्यास तक्रारदाराला सांगितले. तक्रारदाराने ६० हजारांची रक्कम जोळदापके याच्याकडे दिल्यानंतर एसीबी टीमने तत्काळ झडप घालून दापकेला रंगेहाथ पकडले.

त्यानंतर ग्रामसेवक सस्ते आणि भोसले या दोघांनाही पकडण्यात आले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई केली. या तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, हवालदार भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुंखे, मारूती अडागळे, संजय अडसूळ, प्रशांत ताटे आदींनी भाग घेतला.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर