शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तिघाजणांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:32 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराच्या हद्दीतील कालव्यात वाहून जाऊन बुडून अमित रवींद्र शिंदे (वय १० रा. रहिमतपूर, ता. ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराच्या हद्दीतील कालव्यात वाहून जाऊन बुडून अमित रवींद्र शिंदे (वय १० रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवेंद्र्रराजे ट्रेकर्सच्या शोध मोहिमेमुळे रात्री पावणेएक वाजता मृतदेह वाठार येथील कोंबडवाडी जॅकवेल येथे सापडला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रहिमतपूर गांधीनगरमधील काही महिला रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धुणे धुण्यासाठी रहिमतपूर-बोरगाव रस्त्यावरील बेंद नावाच्या शिवारातील कालव्यावर गेल्या होत्या. आईच्या पाठोपाठ तो मुलगाही तिथे पोहोचला. सध्या कालव्याला जास्त प्रमाणात पाणी सोडले आहे. अमित शिंदे हा कालव्यावर खेळता-खेळता पाय घसरून पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो पाण्यातून वाहून गेला. याची माहिती तत्काळ रहिमतपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागत नव्हता. रहिमतपूरचे पोलीस पाटील दीपक नाईक व पोलिसांनी शिवेंद्रराजे ट्रेकर्सला पाचारण केले. ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार यांच्यासह त्यांच्या सहा जणांच्या टीमने शोध मोहीम राबवली. रात्री पावणे एकच्या सुमारास वाठार येथील कोंबडवाडी जॅकवेलजवळ अमित शिंदे याचा मृतदेह सापडला. रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली .धोम डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेहवाई : धोम डाव्या कालव्यात देगाव गावाच्या हद्दीत सोमवारी दुपारी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. गौरव प्रकाश चव्हाण (वय १०, रा़ वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) मृत मुलाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, गंगापुरी येथील यात्रा मैदानावर मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्यासाठी गौरव रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गेला. सोमवारी सकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी वाई पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, दुपारी देगावच्या हद्दीत धोम कालव्यामध्ये काही नागरिकांना गौरवचा मृतदेह आढळून आला.याबाबत माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता संबंधित मृतदेह हा गौरवचाच होता़ आई अश्विनी प्रकाश चव्हाण (वय २८, रा. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली होती़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सी. आर. कदम करीत आहेत़पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यूतरडगाव : तरडगाव ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. भानुदास कानडे असे मृत व्यक्तीचे नाव आहेत. लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.