शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील जयसिंगपूरचे तिघे ठार

By दत्ता यादव | Updated: August 26, 2023 11:22 IST

तवेरा गाडीचा टायर फुटला; नवी मुंबईहून गावी जाताना अपघात

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या तवेरा गाडीचा  टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच घरातील तीन जण ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ झाला. 

निखिल श्रीकांत सवाखंडे (वय 30),प्रियांका निखिल सवाखंडे (32),शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे (63, सर्व रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्या एकाच कुटुंबातील लोकांची नावे आहेत. इतर जखमींवर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे  तवेरा गाडीतून निघाले होते.

साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूमजवळ अचानक तवेरा गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला तवेराची पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या गाडीत प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.  आणि इतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा  भीषण होता की, यामध्ये तवेरा गाडीचा चक्काचूर झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात