शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांंची उचलबांगडी !--ग्रामस्थांनी मानले ‘लोकमत’चे आभार !

By admin | Updated: April 12, 2015 23:59 IST

तारळे आरोग्य केंद्राची झाडाझडती : जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर अनेक धक्कादायक बाबी उघड --लोकमतचा दणका

एकनाथ माळी -तारळे --रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा न पुरवणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, बेशिस्त वर्तन व वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी आरोग्य विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वादविवादाच्या घटना वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या थोपविण्यास अपयश आले. त्यामुळे रुग्णांची फरपट सुरू झाली. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला व त्यांच्या नातेवाइकांना अनेक वेळा मरणयातना सोसण्याची वेळ आली. अखेर वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी दवाखान्याला टाळे ठोकले. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला रात्री ११.३० वाजता दवाखान्यात आणल्यानंतर रात्री मुक्कमी असणाऱ्या आरोग्य सेविका गैरहजर असल्याने नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्याला टाळे ठोकले.या गंभीर घटनेची जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी दखल घेत तातडीने दवाखान्याला भेट दिली. परिस्थितीची पाहणी करून रुग्णांच्या नातेवाइकांशी व ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. याची गंभीर दखल घेत त्यांनी बेशिस्त वर्तन, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, सेवा न पुरवणे व इतर तक्रारीवरून वैद्यकीय अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदली केली. (वार्ताहर)ग्रामस्थांनी मानले ‘लोकमत’चे आभार ! तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील गचाळ कारभार ‘लोकमत’ने वेळोवेळी चव्हाट्यावर आणला आहे. दोन दिवसांपूर्वी संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकल्याचा प्रकारही ‘लोकमत’ने सर्वप्रथम सर्वांसमोर आणला. त्यामुळे प्रशासनाला जाग आली. या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनी तातडीने आरोग्य केंद्राला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. अखेर आरोग्य केंद्रातील चौघांची बदली करण्यात आली. त्यामुळे रुग्णांची फरपट बंद झाली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे व ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाने नमते घेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या व रुग्णांना योग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लढ्याला यश आल्यामुळे ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले. वादविवादाचा रुग्णांना फटकातारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने प्रसूतीसाठी बहुतांशी महिला येथे दाखल होतात. मात्र, गत दीड ते दोन वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांमध्येच अनेक कारणांनी वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत. याचा फटका रुग्णांना बसत होता.