शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

किरुंडे व मालतपूरमधील तिघांना वणवा लावल्याप्रकरणी दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:35 IST

fire forest Department Satara-वाई वनपरिक्षेत्रातील वाशिवली परिमंडळात किरुंडेमधील राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी रामचंद्र जुकाराम ढवळे व चंद्रभागा रामचंद्र ढवळे या दाम्पत्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे. दरम्यान, व्याहळी परिमंडळातील मालतपूर वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी संतोष आत्माराम वाडकर यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला आला. दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे.

ठळक मुद्देकिरुंडे व मालतपूरमधील तिघांना वणवा लावल्याप्रकरणी दंड दाम्पत्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड

वाई : वाई वनपरिक्षेत्रातील वाशिवली परिमंडळात किरुंडेमधील राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी रामचंद्र जुकाराम ढवळे व चंद्रभागा रामचंद्र ढवळे या दाम्पत्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे. दरम्यान, व्याहळी परिमंडळातील मालतपूर वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी संतोष आत्माराम वाडकर यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला आला. दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद आकारण्यात आली आहे.वनविभागाने दिलेली माहिती अशी कि, किरुंडेमधील वनक्षेत्रात मंगळवार ७ फेब्रुवारी २०२१ रोजी ढवळे कुटुंबीयांनी जळावू लाकूड तयार करीत असताना शेजारीच असणाऱ्या वनविभागाच्या परीक्षेत्रास आग लागल्याने १० हेक्टर परिसर जाळून खाक झाले.

यात वनविभागाचे पाच हजार रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले. तर १ एप्रिल २०२० मध्ये व्याहळी परिमंडळात मालतपूर परिक्षेत्रात शेताचा बांध जाळताना शेजारील वनविभागाच्या क्षेत्रात वीस हेक्टर परिसरात वणवा लागून १५ हजार रुपयांचे वनविभागाचे नुकसान झाले. याप्रकरणी संतोष वाडकर यांना १ डिसेंबर २०२० रोजी न्यायलयाने पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे.या गुन्ह्यांप्रकरणी वनविभाग सत्र न्यायालय सातारा येथे अपील करणार आहे. संबंधीत आरोपींविरुद्ध भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम २६ (१), (ब), (फ) चे उल्लंघण झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक सातारा भारतसिंग हाडा, सहायक वनसंरक्षक सातारा गोसावी, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल रत्नाकर सीताराम शिंदे, संदीप पवार, प्रदीप जोशी, अजित पाटील, वनरक्षक करुणा जाधव यांनी कारवाईत भाग घेतला.

टॅग्स :fireआगforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर