शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर वीज पडून तीन घोडी जागीच ठार, घोडे व्यावसायिक बालबाल बचावले

By दीपक शिंदे | Updated: October 20, 2022 19:10 IST

ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिकांवर संक्रात

दिलीप पाडळेपाचगणी : विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे झाडाच्या आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झालीत. ही घटना आज, गुरुवारी (दि.२०) पाचगणी टेबल लँन्ड पठारावर दुपारच्या सुमारास घडली. घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले.पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही घोडे व्यावसायिकांनी आपली घोडी झाडालगत असणाऱ्या स्टॉल समोर व आडोश्याला बांधून सदर व्यावसायिक दुसऱ्या स्टॉलमध्ये थांबले. यावेळी जोरदारपणे वीज कोसळल्याने तीन घोडी जागीच ठार झाली. ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.या घटनेत शंकर गायकवाड, संभाजी दामगुडे, सुनील कांबळे यांचे अंदाजे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. या स्थितीत या घोडेचालकांना शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच घोडे व्यावसायिकांचा व्यवसायही अडचणीत आल्याने त्यांना जिल्हा प्रशासनाकडूनही मदत व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर