शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

हुतात्मानगरीत हजारो विद्यार्थ्यांची ‘जलप्रतिज्ञा’

By admin | Updated: March 25, 2016 23:35 IST

‘लोक’चळवळीत सहभाग : कोरडी रंगपंचमी खेळून पाणी वाचविण्याची घेतली शपथ!

सातारा : जिल्ह्यातली सारीच धरणं कोरडी पडत चाललीयंत. लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय. घोटभर पाण्यासाठी शेकडो गावं तहानलीयंत. अशावेळी या तहानलेल्या गावांच्या भावनेचा आदर करत यंदा पाणी न उधळता रंगपंचमी साजरी करणं काळाची गरज आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘रंगोत्सव पाण्याच्या नासाडीविना’ ही मोहीम हाती घेतली. बघता-बघता असंख्य शाळा यात सहभागी होत आहेत. पाणी बचतीची शपथ दिली जात आहेत. वडूज : हुतात्मानगरी म्हणून जिल्ह्याला प्रसिद्ध असलेल्या वडूज शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात मंगळवारी ऐतिहासिक घटना घडली. एकमेकांना रंगात न्हाऊन काढण्याचे स्वप्न पाहत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एका आवाजात, एका सुरात जलप्रतिज्ञा घेतली. ‘दुष्काळी स्थितीत कोरडी रंग पंचमी घेळण्याची मी शपथ घेत आहे...’ अशी शपथ घेत पाण्याचा अपव्यय टाळण्याची हमी दिली.सामाजिक चळवळीत वडूज शहराने कायमच पुढाकार घेतला आहे. वडूजमधील शाळांनी ‘लोकमत’च्या चळवळीत उडी घेतली. प्राचार्य दिलीप डोईफोडे, पर्यवेक्षक मोहन पोतदार, प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे, उपध्याक्ष मुन्ना मुल्ला, संतोष देशमाने, डॉ. सौरभ जोशी, अ‍ॅड. श्रीकांत तोडकर, विशाल भागवत, डॉ. प्रवीण चव्हाण, प्रसाद जगदाळे,अनिकेत कुंभार, डॉ. वैभव भंडारे, ईश्वर जाधव, धनंजय गोडसे, रतनशेठ पवार, रोहित शहा, विशाल महामुनी, मोहित शहा, राहुल लोहार, प्रसाद तोडकर, प्रमोद गांधी, विजय कुलकर्णी, चंद्रकांत काटकर उपस्थित होते. प्रसाद जगदाळे यांनी ‘जलप्रतिज्ञा’ वाचून दाखविली. आलोरे विभागाचे आनंद मोरे यांनी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवाहन केले. (प्रतिनिधी)कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे विद्यार्थीही खेळणार कोरडी रंगपंचमीभुर्इंज : आदर्श शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदर्श निर्णय घेतला आहे. सध्या दुष्काळाचे भीषण सावट घोंगावत आहे. घोटभर पाण्यासाठी तडफडणाऱ्या शेकडो गावांच्या भावनेचा आदर करून रंगपंचमीला पाण्याची भरमसाठ उधळण न करता कोरडी रंगपंचमी साजरी करण्याची मानसिकता सर्वत्र बळावत आहे. ही संवेदनशीलता रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही दाखवली आहे. वाई तालुक्याच्या पूर्व भागातूनही या विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. ते दुष्काळाचे चटके सोसत आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या वास्तवतेचे भान या विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही आहे. त्यातूनच प्राचार्य आर. एस. पाटील यांनी सर्व सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना दुष्काळाचे वास्तव समजावून सांगत रंगपंचमीला पाण्याचा किती अपव्यय होतो, ते समजावून सांगितले. कोरड्या रंगपंचमीमुळे होणारे फायदे, वाचणारे पाणी आणि आरोग्याचे लाभही स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमताने होकार दर्शवल्यानंतर कोरडी रंगपंचमी खेळण्याबाबतची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे कोरडी रंगपंचमी कशी खेळायची याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. (प्रतिनिधी)होळीची पोळी गरजूंना दान!ग्रामीण भागातून होळीसाठी लाकडे वापरण्याची परंपरा आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तो टाळण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच होळीत नैवेद्य अर्पण केला जातो. हीच पोळी एखाद्या गरीबाला दिलातर त्याची पोट भरू शकते. तो भुकेल्याला देण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला व प्रत्यक्षात अंमलातही आणला. रंग बरसे... पाण्याविना अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांचं दु:ख माण-खटावमधील जनता जाणून आहे. सर्वत्र पाणीटंचाईचे संकट आ वासून समोर असताना रंगपंचमीला पाण्याचा वारेमाप वापर करणे योग्य नाही. यासंदर्भात माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली. तसेच स्वत:बरोबरच इतरांनाही कोरडी रंगपंचमी खेळण्यास प्रवृत्त करण्याबाबत शपथ देण्यात आली.