शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नो टोबॅको रनमध्ये धावले हजारो सातारकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 18:13 IST

तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी व तंबाखूमुक्त सातारा निर्मितीसाठी तसेच लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने रविवार, १० रोजी सकाळी साडेपाच वाजता नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सातारकरांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सातारा : तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी व तंबाखूमुक्त सातारा निर्मितीसाठी तसेच लोकांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने रविवार, १० रोजी सकाळी साडेपाच वाजता नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो सातारकरांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम राबविण्याची ही प्रथमच वेळ आहे. गेल्यावर्षीपासून या नो टोबॅको रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करत आहे. व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने वात्सल्य फाउंडेशन हॅपी, पीपल फाउंडेशन यांच्या सहकार्याने नो टोबॅको रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने, वात्सल्य फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, हॅपी पीपल फाउंडेशनचे अजय गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक पोळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक मोरे, दंत शल्यचिकित्सक डॉ. योगिता शहा, दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे आदींची उपस्थिती होती.