शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विस्तवाला हात लावणाऱ्यांना चटका काय असतो तो दिसेल, अंबादास दानवे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:00 IST

मुख्यमंत्र्यांनी छ. शिवरायांची शपथ घेतलीय

सातारा : सातारा असो किंवा महाराष्ट्र, शिवसेना आपल्या पद्धतीने काम करत आहे. विस्तवाला ज्यांनी हात लावला तर त्याला कसा चटका बसतो हे आगामी काळात दिसून येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी दिला.कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीच्या उद्घाटनास आले असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.दानवे म्हणाले, फडणवीस यांना कारसेवक असल्याचा पुरावा सादर करावा लागतोय यातच आमचे यश आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले होते की, बाबरी मशीद जमीनदोस्त शिवसैनिकांनी केली त्याचा सार्थ अभिमान आहे.शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील परिस्थितीबाबत प्रश्न विचारला असता आ. दानवे म्हणाले, शिवसेना पक्ष फिनिक्स पक्ष आहे. थोडीशी फुंकर घातली जी विस्तव होतो. अन् विस्तवाला कोणी हात लावला तर त्याला कसा चटका बसतो हे आगामी काळात दिसेल.आ. दानवे पुढे म्हणाले, बैलगाडा शर्यत ग्रामीण भागातील मातीतील खेळ, उत्सव आहे. प्रत्येक ठिकाणी हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे पार पडत असतो. साताऱ्यातील बैलगाडा शर्यत ही वेगळीच ओळख आहे.मुख्यमंत्र्यांनी छ. शिवरायांची शपथ घेतलीयजरांगे-पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा दिला आहे, त्यावर आ. दानवे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने वारंवार तारीख पे तारीख दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांची मागणी पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला आरक्षण प्रश्न सोडवायचा नसून जाती जातीत भांडणे लावायची असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना