शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कऱ्हाड पालिकेतील सभेत नगराध्यक्षांच्या अवमानाचा तिसरा अंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 22:56 IST

कऱ्हाड : विषय पत्रिकेवरील ४८ विषयांपैकी अवघ्या तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी देत कºहाड पालिकेतील जनशक्ती आघाडीने उर्वरित विषय हे स्थायीपुढेच आले पाहिजेत.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेतील विषय ‘जनशक्ती’ने नाकारलेतीन विषयांना मंजुरी; उर्वरित विषय स्थायीला घेण्याचे संकेत

कऱ्हाड : विषय पत्रिकेवरील ४८ विषयांपैकी अवघ्या तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी देत कºहाड पालिकेतील जनशक्ती आघाडीने उर्वरित विषय हे स्थायीपुढेच आले पाहिजेत. असे संकेत दिले खरे पण यादरम्यान पिठासन अधिकारी म्हणून काम करणाºया नगराध्यक्षा आपली जागा सोडण्यापूर्वीच जनशक्तीच्या नगरसेवकांनी सभागृह सोडल्याने नगराध्यक्षांच्या अवमानाचा बुधवारी तिसरा अंक पार पडल्याची चर्चा बुधवारी पालिका वर्तुळात सुरू आहे.

कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पालिकेच्या सभागृहात पार पडली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. तर उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. केवळ पाऊणतासाच्या सभेत अवघ्या तीन विषयांना सत्ताधारी जनशक्तीने मंजुरी मिळवली खरी; पण उरलेले सर्व विषय पुन्हा एकदा प्रलंबित पडले आहेत.

यापूर्वी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे नगराध्यक्षा रोहिणी शिंदेंना अश्रू आवरता आले नाहीत. याची चर्चा कºहाडात आजही सुरूच आहे. हा नगराध्यक्षांच्या अवमानाचा पहिला अंक मानला जातो. तर १६ नोव्हेंबर रोजी बोलविलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला जनशक्ती आघाडीने बहिष्कार तर टाकलाच; पण त्यानंतर लगेच दुसºया दिवशी एका कारपेट रस्ता भूमिपूजनाला नगराध्यक्षांना डावलून पुन्हा एकदा त्यांचा अवमान केल्याची चर्चा आहे. त्यात भरीस भर म्हणून बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत सभा सुरू असताना केवळ तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी घेऊन मधूनच कोणाचीही परवानगी न घेता जनशक्तीच्या नगरसेवकांनी सभागृह सोडल्याने हा त्यांच्या अवमानाचा तिसरा अंक झाल्याची चर्चा नागरिकांच्यात सुरू आहे.

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडीमुळे पालिकेतील बुधवारची सभा वादळी होईल, अशी चर्चा लोकांच्यात होती. त्यामुळे सभेच्या सुरुवातीलाच आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी स्थायीची बैठक घेणार नसल्याचे आपण कोणत्या अधिकारांतर्गत सांगितले असल्याचा प्रश्न नगराध्यक्षा शिंदे यांना विचारला. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी नगराध्यक्षांना सर्व अधिकार आहे, असा खुलासा केला.

नगराध्यक्षांना लोकांनी निवडून द्यायचे आणि त्यांनाच डावलायचे हा लोकशाहीचा अपमान आहे, हे सहन क रणार नाही. असे सांगत पावसकरांनी कायद्याचे पुस्तकच काढले. त्यावर वाटेगावकरांनी येथून पुढच्या स्थायीच्या सभा मग कायद्यानुसारच होतील, असा इशारा दिला.उपनगराध्यक्षांना सभा बोलविण्याचा अधिकारसात दिवसांच्या आत जर स्थायी समितीची बैठक नगराध्यक्षांनी घेतली नाही तर उपाध्यक्षांना ती बोलविण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना विचारला. त्यावर डांगे यांनी कलम ८२ मधील २ व ३ नुसार उपाध्यक्षांना स्थायीची बैठक घेण्याचे अधिकार असल्याचे सांगितले. त्यामुळे जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांच्या चेहºयावर समाधान दिसत होते.पावसकरांना अधिकार कुणी दिला : जयवंत पाटीलस्थायी समितीच्या बैठका घेणार नसल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांना हे अधिकार कुणी दिले. स्थायीची बैठक घेण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असतात व त्या नसतील तर उपनगराध्यक्षांना असतात. मग याबाबत भाष्य करण्याचा अधिकार पावसकरांना कुणी दिला? असा सवाल उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सभागृहात केला.नगराध्यक्षा या स्टॅम्प आहेत का? : पावसकरकºहाडच्या नगराध्यक्षांना मोठ्या मताधिक्याने शहरातील जनतेने निवडून दिले आहे. त्यांना स्थायी समितीची सभा केव्हा व कधी घ्यायचे अधिकार आहेत. मात्र, आपण बोलू तेव्हाच सभा घ्यायची, असे सांगत सभा घेण्यावर दबाव टाकणाºयांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की येथे हुकू मशाही नाही लोकशाही आहे. आम्ही मंजूर केलेल्या कामांवर नगराध्यक्षांनी फक्त सह्या करायला त्या काय स्टॅम्प आहेत का? असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी सभागृहात उपस्थित केला.ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी ड्रेनेज योजनेच्या कामाची वर्षभरात कधी चौकशीसुद्धा केलेली नाही. की काम करणाºया लोकांचे तोंडही बघितलेले नाही. मात्र, आम्ही ज्यावेळी आझाद चौकात रस्त्याच्या कामाचे उद्घाटन घेतले. त्यानंतर या अण्णा ‘बहाद्दरां’नी त्या कामाच्या ठेकेदारास कामाची बिले काढणार नसल्याचे सांगितले. जर कामांची बिलेच निघणार नसतील तर कामे कशी करायची? असा प्रश्न उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर