शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चोरट्यानेच पुढे चोरटे असल्याचे सांगून फसविले, वृध्देचे दागिने लांबविले

By नितीन काळेल | Updated: October 25, 2023 15:17 IST

सातारा : पुढे चोरटे सुटले आहेत असे सांगून चोरट्यानेच वृध्देचे दागिने लांबविले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर ...

सातारा : पुढे चोरटे सुटले आहेत असे सांगून चोरट्यानेच वृध्देचे दागिने लांबविले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी अनुसया भास्कर शिंदे (रा. सदर बझार, सातारा) या वृध्देने तक्रार दिलेली आहे. तर दि. २३ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार कूपर काॅलनीतील रस्त्यावर घडला. तक्रादार या कोंडवे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. रामकुंड येथे बसस्टाॅपजवळ थांबल्यावर अनोळखी दोघेजण आले. त्यांनी पुढे चोर सुटले आहेत, असे सांगून वृध्देला दागिने कागदाच्या पुडीत ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे वृध्देने दागिने दिले. त्यानंतर दागिने घेऊन चोरट्यांनी खडा ठेवून पुडी वृध्देच्या हातात दिली. फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. या घटनेत माळ आणि कर्णफुले चोरट्यांनी लांबविली. याची किंमत सुमारे ४५ हजार रुपये होती. सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक जगताप हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी