शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कार्यकर्ते, माध्यमांनी पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा तयार केली, पण..; शंभूराजेंनी स्पष्टच सांगितलं

By प्रमोद सुकरे | Updated: February 1, 2025 13:29 IST

कऱ्हाड : सातारच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा नव्हतीच मुळी. ती कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांनी तयार केली होती. मी तर त्यासाठी कुठलेही लॉबिंग, ...

कऱ्हाड : सातारच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा नव्हतीच मुळी. ती कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांनी तयार केली होती. मी तर त्यासाठी कुठलेही लॉबिंग, विशेष प्रयत्न केले नव्हते. टीव्हीवर बातम्या आल्यावरच मला सातारचा पालकमंत्री झाल्याचे कळाले. आणि मी पहिल्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा पालकमंत्री झालो आहे. त्यामुळे पालकमंत्री झाल्यात काही विशेष वाटत नाही. आता जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे असे मत सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कऱ्हाडात निवडक माध्यम प्रतिनिधींशी औपचारिक बोलताना व्यक्त केले. पालकमंत्री झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आपल्याला भेटले का? याबाबत छेडले असता होय, परवा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळी त्यांची व माझी भेट झाली. त्यांनी पुष्पगुच्छ देत मला शुभेच्छाही दिल्या आहेत. मी ही त्यांना पालकमंत्री म्हणून काम करत असताना तुमच्या आशीर्वादाची आणि मार्गदर्शनाची मला गरज आहे. तुमच्याच नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यात काम करणार आहोत असे सांगितले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.तुमच्या निवडीनंतर साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका महिला संचालकांनी माध्यमांतून उघड नाराजी व्यक्त केली होती. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पालकमंत्रीपद दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती.प्रसंगी आंदोलन करू असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता मंत्री देसाई यांनी त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे त्या जिल्ह्याला माहिती झाल्या. अशी खोचक टिप्पणी करणे पसंत केले. ठाण्याचे पालकमंत्रीपद सांभाळणे तेवढे सोपे नव्हते, मात्र.. ठाण्याचा पालकमंत्री होतो. पण ठाण्याचे पालकमंत्रीपद सांभाळणे तेवढे सोपे नव्हते. मात्र आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला पात्र राहून, सर्वांना बरोबर घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळाले याचे समाधान वाटते.असेही मंत्री देसाईंनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी सूचना करतो - मंत्री देसाईमहामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले.त्यावेळी डी पी जैन कंपनीचे प्रमुख काही दिवसांपूर्वी मुंबईला मला भेटायला आले होते. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही. पण आता त्यांना बोलावून घेऊन या कामाला गती देण्यासाठी सूचना करतो असेही मंत्री देसाईंनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरguardian ministerपालक मंत्रीShambhuraj Desaiशंभूराज देसाईUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले