शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

माणुसकीने-प्रेमाने सांगण्याची वेळ गेली; आता, कायदा आणि नियम याचाच धाक दाखविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:25 IST

आत्तापर्यंत जिल्ह्यात लागण झालेले २१ रुग्ण आढळले. यातील प्राथमिक लागण झालेला एकही रुग्ण स्थानिक नाही. कोणी दुबईवरून आले, कोणी कॅलिफोर्नियातून, कोणी मुंबईहून तर कोणी पुण्यातून. प्रवास करू नका, बाहेर जाऊ नका, असे कितीही सांगितले तरी मनावर कोण घेतं.

ठळक मुद्दे मग एक हजार प्रवासी आले तरी कोठून ! जिल्ह्याची सीमा तर पंधरा दिवसांपासून बंद 

दीपक शिंदे ।सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला तसा जिल्ह्याच्या सीमा लॉक करण्यात आल्या; पण या लॉकचा प्रभाव काही दिसून आला नाही. सब लॉक तरीही सबकुछ खुला, अशीच स्थिती पाहायला मिळते. बरोबर एक महिन्यापूर्वी २३ मार्चला जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही ३८९ होती. एक महिन्यानंतर आता २३ एप्रिल रोजी ही संख्या ११७३ आहे. याचाच अर्थ कोणीतरी दरवाजा खुला सोडत आहे.

जिल्ह्याच्या बाहेरून येणा-या आणि विशेषत: पुणे, मुंबईवरून येणाºया लोकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो. यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. सातारा जिल्ह्यातून कोणालाही बाहेर जाता येत नाही आणि कोणालाही आत येता येत नाही. तरी देखील सुमारे साडेसातशे लोक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शासकीय आकडेवारीच रोज बदलत आहे. दररोज जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे हे लोक येतात तरी कोठून? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

आत्तापर्यंत जिल्ह्यात लागण झालेले २१ रुग्ण आढळले. यातील प्राथमिक लागण झालेला एकही रुग्ण स्थानिक नाही. कोणी दुबईवरून आले, कोणी कॅलिफोर्नियातून, कोणी मुंबईहून तर कोणी पुण्यातून. प्रवास करू नका, बाहेर जाऊ नका, असे कितीही सांगितले तरी मनावर कोण घेतं. या हेकेखोरीमुळे एक महिन्यात एकाचे एकवीस झाले. कºहाड आणि जावळी तालुक्यातील बाधितांमुळे ही संख्या आणखी वाढली.

योग्य खबरदारी आणि लोकांचा संपर्क टाळणे अशा प्राथमिक गोष्टी पाळणे गरजेचे आहे; पण त्यामध्येही नागरिक गंभीर नाहीत. त्यामुळेच अशा उद्रेकाला सामोरे जावे लागते. अजूनही सावरण्याची वेळ आहे. क-हाड आणि मलकापूर पूर्ण बंद केले गेले आहे. जिल्ह्यात थोडीफार उसंत आहे; पण हे प्रमाण वाढले तर तालुकेही लॉकडाऊन करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने ही नाकेबंदी आणखी कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.प्रशासन अजूनही दाखवतंय माणुसकीलोकांची अडचण व्हायला नको म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघेही अजूनही माणुसकी दाखवून सर्वांना विनवणी करत आहेत. काही पाच-दहा टक्के लोकांमुळे अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत आहेत; पण या पाच दहा टक्क्यांना सुधारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक स्वत:च रस्त्यावर उतरल्या आहेत. आता माणुसकीने आणि प्रेमाने सांगण्याची वेळ निघून गेली आहे. आता, कायदा आणि नियम याचाच धाक दाखविण्याची गरज आहे.जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी पासची प्रतीक्षासातारा जिल्ह्यात बाहेरून येणाºया लोकांना बंदी आहे. त्याप्रमाणेच पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही जाता येत नाही. त्यामुळे एका जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी पास दिला तरी दुसºया जिल्ह्यातील यंत्रणा जिल्हाबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करू शकते. त्यामुळे पोलीस अधीक्षक पातळीवरून कोणालाच जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अनेकजण गेल्या एक महिन्यापासून पास मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या महिनाभरात बाहेरून आलेले प्रवासी२१ मार्च267२५ मार्च411३१ मार्च543५ एप्रिल666१० एप्रिल835१५ एप्रिल917२० एप्रिल1087२४ एप्रिल1214

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या