साताऱ्यात औद्योगिक वसाहतीतून आठ शेळ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST2021-07-08T04:25:58+5:302021-07-08T04:25:58+5:30

सातारा : येथील जुनी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गणेश चौकातलगतच्या रिकाम्या जागेत चरत असलेल्या आठ शेळ्यांची चोरी झाल्याचा प्रकार ...

Theft of eight goats from an industrial estate in Satara | साताऱ्यात औद्योगिक वसाहतीतून आठ शेळ्यांची चोरी

साताऱ्यात औद्योगिक वसाहतीतून आठ शेळ्यांची चोरी

सातारा : येथील जुनी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गणेश चौकातलगतच्या रिकाम्या जागेत चरत असलेल्या आठ शेळ्यांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. या शेळ्यांची किंमत २८ हजार रुपये आहे. ही घटना मंगळवार, दि. ६ रोजी घडली.

याबाबत मंगल विश्­वनाथ माने (रा. धनगरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, मंगल माने या मेंढपाळ असून, त्यांच्याकडे आठ शेळ्या होत्या. मंगळवारी त्यांनी आपल्या शेळ्या जुनी एमआयडीसी परिसरातील गणेश चौकालगत असलेल्या रिकाम्या जागेत चरण्यासाठी सोडल्या होत्या. मात्र, येथून त्या चोरीला गेल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

Web Title: Theft of eight goats from an industrial estate in Satara