शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Satara: अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग पडले अडीच लाखांना, बीई मेकँनिकल इंजिनिअर हतबल

By दत्ता यादव | Updated: November 20, 2023 15:50 IST

हाॅटेल व इतर ठिकाणांना रेटिंग देण्याचे सांगून घातला तरुणाला गंडा

सातारा : उच्चशिक्षित मुलेही सायबर चोरट्यांच्या गळाला लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असून, साताऱ्यातील एका बीई मेकँनिकल इंजिनिअरला अनोळखी व्यक्तीशी मोबाइलवर चॅटिंग करणे महागात पडले आहे. हाॅटेल व इतर ठिकाणांना रेटिंग देण्याचे सांगून संबंधिताने तब्बल २ लाख ६५ हजारांना अभियंत्या तरुणाला गंडा घातला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा २८ वर्षीय तरुण बीई मेकँनिकल इंजिनिअर आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्या टेलीग्रामवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये हाॅटेलला रेटिंग दिल्यास काही पैसे मिळतील, असे सांगितले. त्या अभियंत्या तरुणाने चॅटिंग करण्यास सुरुवात केली. अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर वेगवेगळे टास्क करायला सांगितले. तो जसे सांगत गेला.तसे अभियंता तरुण ऐकत गेला. १८० रुपये अभियंत्या तरुणाच्या अकाउंटमध्ये पाठवून अनोळखी व्यक्तीने त्याचा विश्वास संपादन केला. मात्र, रेटिंग देताना काही चुका झाल्या आहेत, तुम्हाला आणखी पैसे द्यावे लागतील, असे सांगून संबंधित व्यक्तीने दहा-पाच हजार नव्हे तर तब्बल दोन लाख ६५ हजार रुपये उकळले. तेव्हा संबंधित अभियंता खडबडून जागा झाला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला. आपली चूक लक्षात येताच त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांकडून तपास सुरूया फसवणूक प्रकरणाची सायबर पोलिसांनी दखल घेतली असून, संबंधित अभियंत्याच्या मोबाइलवरून नेमके कोणत्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले, याची माहिती सायबर पोलिस घेत आहेत. जेणेकरून सायबर चोरट्याच्या हाती पैसे लागू नयेत, यासाठी सायबर पोलिस प्रयत्नशील आहेत.

आपल्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही लिंक ओपन करू नका, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. उच्चशिक्षित मुले अशा लिंकवर तत्काळ विश्वास ठेवतात. अनेकदा अशा लिंक ओपन करू नका, असे सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. सगळ्यात सतर्कता महत्त्वाची आहे. -अरुण देवकर, पोलिस निरीक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी