शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पुलाच्या कामावेळीच कण्हेर योजनेची जलवाहिनी फुटली, दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

By सचिन काकडे | Updated: March 13, 2024 14:15 IST

सातारा : शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...

सातारा : शाहूपुरी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी फुटल्याने या भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पालिकेने जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.सातारा पालिकेच्या वतीने शाहूपुरी चौकालगत असलेल्या जुन्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळी या कामासाठी खोदकाम सुरू असतानाच कण्हेर योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले शिवाय शाहूपुरीचा दैनंदिन पाणीपुरवठाही ठप्प झाला. मंगळवारी पाणीकपात व बुधवारी पाणीच न आल्याने येथील नागरिकांना कित्येक अडचणींचा सामना करावा लागला.जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु हे काम पूर्ण न झाल्यास येथील रहिवाशांना गुरुवारी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकताे. त्यामुळे जीवन प्राधिकरणे शाहूपुरी भागाला तात्पुरत्या स्वरुपात कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा करावा, कोटेश्वर उपसा केंद्रातील पंप नादुरुस्त असतील तर ते तातडीने दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी भारत भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महानुभव मठाजवळही गळती..साताऱ्यातील महानुभव मठाजवळ असलेल्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला बुधवारी सकाळी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लीटर पाणी वाया गेल्याने महानुभव मठ व आकाशवाणी झोपडपट्टी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलवाहिनीवरुन अवजड वाहन गेल्याने हा प्रकार घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी