शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्या समाधिस्थळांचे होणार संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:02 IST

अजित पवार यांचा हिरवा कंदील : शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

सातारा/मुंबई : साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याचे संवर्धन तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, येसूबाई राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांचे संवर्धन आणि संगम माहुली घाट विकसित करण्याच्या कामांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला. या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी बुधवारी सातारा जिल्हा प्रशासनाला केल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला मंत्री नीलेश राणे, बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सांस्कृतिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंद राज, जिल्हाधिकारी संतोष पाटील (व्हीसीद्वारे) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

साताऱ्यातील संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, येसूबाई राणीसाहेब यांच्या समाधिस्थळांचा जीर्णोद्धार, विकास करणे, पहिले शाहू महाराज व अस्तित्वात असणाऱ्या अन्य समाधींचे जतन आणि संवर्धन करणे, राजघराण्यातील व्यक्तींसाठीच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा विकास, घाटाचे विस्तारीकरण, पूर्वकालीन झुलत्या पादचारी पुलाचे नवनिर्माण, काशी विश्वेश्वर, रामेश्वर आणि संगमेश्वर या मंदिरांचे संवर्धन, स्वच्छतागृह, रस्ता, वाहनतळ तसेच रामेश्वर मंदिराच्या परिसरात संग्रहालयाची निर्मिती करणे, याबाबत सविस्तर चर्चा झाली. या कामांसाठी काढण्यात आलेल्या ढोबळ अंदाजपत्रकानुसार ३११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, किल्ले अजिंक्यतारा विकासाबाबतही चर्चा करण्यात आली.

तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचनाबैठकीअंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली. या दोन्ही प्रकल्पांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या. बैठकीत राजकोट (मालवण) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या विकासासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली.अजिंक्यताऱ्यावर सुविधांसाठी ११२ कोटी..किल्ले अजिंक्यताऱ्यावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मुख्य प्रवेशद्वार आणि दक्षिण दरवाजा, तटबंदी व बुरूज यांचे संवर्धन करणे, राजसदर, टांकसाळी, पाणवठे यांचे संवर्धन करणे, प्रमुख तीन पाणवठ्यांवर मनोरे उभारणे ते एकमेकांना तरंगत्या पुलाने जोडणे, शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग व किल्ल्याचे महत्त्व सांगण्यासाठी एमपी थिएटर विकसित करणे, स्वच्छतागृह, प्रकाश योजना आदी विकासकामांबाबत चर्चा झाली. या कामांसाठी ११२.८७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.