शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात भटक्या श्वानांची दहशत, चालत निघालेल्या महिलेवर केला हल्ला 

By सचिन काकडे | Updated: August 18, 2023 15:37 IST

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला

सातारा : साताऱ्यातील विसावा नाका येथे राहणाऱ्या अस्मिता कुलकर्णी (वय ६५) या महिलेवर भटक्या श्वानांनी हल्ला केला. श्वानांना हुसकावून लावताना रस्त्यावर आदळल्याने त्यांना दुखापतही झाली. परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.अस्मिता कुलकर्णी बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घराच्या दिशेने चालत निघाल्या होत्या. यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते. काही अंतर पुढे गेल्यानंतर एकापाठोपाठ एक सात ते आठ श्वानांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हातातील बॅगेने श्वानांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत असताना त्या रस्त्यावर आदळल्या. यामध्ये त्यांना दुखापतही झाली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दगड, वीटांचे तुकडे श्वानांच्या दिशेने भिरकावून त्यांना हुसकावून लावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून, पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी अस्मिता कुलकर्णी यांनी केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdogकुत्रा