शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

तहसीलदारांच्या नोटिसीला वाटाण्याच्या अक्षता, वडूजच्या गुदमरणाऱ्या मैदानाला मोकळे करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:59 IST

वडूजमधील साडेदहा एकरातील तालुका क्रीडा संकुल खेळाविना पंचवीस वर्षांपासून पडून

शेखर जाधववडूज : वडूजमधील साडेदहा एकरातील तालुका क्रीडा संकुल खेळाविना पंचवीस वर्षांपासून पडून आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे संकुलाच्या चौफेर अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना काही वर्षांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांनाही अतिक्रमणधारकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.वडूजमध्ये १९९६ मध्ये राज्यातील पहिले क्रीडा संकुल म्हणून मान्यता मिळाली. तालुक्यातील क्रीडाप्रेमींच्या आनंदोत्सव साजरा झाला. तालुक्याच्या ठिकाणी एक क्रीडा संकुल या धर्तीवर संकुल उभारले. जागाही आरक्षित केलेली आहे. आजअखेर धावपटी, बॅडमिंटन कोर्ट सुसज्ज आहे. संरक्षण भिंतीसाठी निधी ही मंजूर आहे. अतिक्रमण फोफावल्यामुळे अनेक खेळाडूंना मैदानाअभावी खेळाचा सराव करणे कठीण बनले आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडील जागा १५ जानेवारी १९९० च्या अध्यादेशानुसार वडूज ग्रामपंचायतीकडे क्रीडांगणसाठी भाडेतत्त्वावर प्रदान केली. वडूज मिळकत नंबर ३८४/१ अ/ १/२ हे हेक्टर क्षेत्र ४ आर मध्ये हे तालुकास्तरीय क्रीडा संकुल आहे. ६७ लाख रुपये खर्चून जिमनॅस्टिक हाॅल व तालुका क्रीडा कार्यालय बांधले; परंतु त्या ठिकाणी वास्तव्य व देखरेख नसल्याने इमारतीचे नुकसान झाले आहे.हुतात्म्यांच्या भूमीतील तालुका क्रीडा संकुलाच्या आरक्षित जागेवर असलेल्या अतिक्रमणधारकांना यापूर्वी तहसीलदारांकडून  नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या महत्त्वपूर्ण विषयाबाबत तालुक्यातील बोटावर मोजण्याइतकेच क्रीडाशिक्षकांची धडपड निश्चितच वाखणण्याजोगी असली तरी त्यांनासुध्दा काहीवेळा मर्यादा पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.

तहसीलदारांनी ठोस पावले उचलावीत या ठिकाणी अतिक्रमण करणारे मजूर दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. वास्तविक पाहता याबाबत क्रीडा संकुल समितीचे सचिव या नात्याने तहसीलदारांनी कठोर व ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

यासंदर्भात तालुका क्रीडा अधिकारी, समिती सदस्य व निमंत्रित सदस्य यांची व्यापक बैठक झाली होती. त्यावेळी प्राधान्याने या गंभीरविषयी सखोलपणे चर्चाही झाली होती. यासंदर्भात पुन्हा तातडीने बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.   - किरण जमदाडे, तहसीलदार, खटाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसर