शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांना दिलासा!, वळवाचा गारवा, तापमानाचा पारा खालावला 

By नितीन काळेल | Updated: May 25, 2024 19:24 IST

उकाड्याने नागरिक झाले होते हैराण

सातारा : दरवर्षीच कडक उन्हामुळे मे महिना तापदायक ठरतो. पण, यंदा वळवाच्या पावसाने धडाका लावल्याने पारा खालावला आहे. सातारा शहराचे तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले आहे. यामुळे उन्हाळा असूनही मे महिना जिल्हावासीयांसाठीतरी सुसह्य ठरल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाळी झळा जाणवायला सुरूवात होते. सुरुवातीला कमाल तापमान ३५, ३६ अंशापर्यंत जाते. त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर पारा ४० अंशाचा टप्पा ओलांडतो. त्यामुळे एप्रिल आणि मे हे दोन महिने तापदायक ठरतात. कारण, पारा सतत वाढलेला असतो. परिणामी उन्हाच्या तीव्र झळा लागतात. अंगातून घामाच्या धारा लागतात. तसेच उकाड्याने हैराण होण्याची वेळ येते. पण, यावर्षी मे महिनातरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी चांगला गेला आहे.यावर्षी जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा वाढला. कमाल तापमान ३९ अंशावर गेले होते. तर एप्रिल महिन्यात तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला होता. त्यातच सतत काही दिवस पारा ४० अंशावरही राहिल्याचे दिसून आले होते. यामुळे जिल्ह्यातील नागरिक तीव्र उकाड्याने हैराण झालेले. दिवसा तर घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते. त्याचबरोबर एप्रिलच्या शेवटच्या काही दिवसांत सातारा शहरातील पारा ४१ अंशापर्यंत पोहोचला होता.त्यामुळे शहरवासीयांना प्रचंड उकाड्याला सामोरे जावे लागले. तर मे महिन्याची सुरुवातही उच्चांकी तापमानाने ठरली. पहिले आठ दिवस पारा अधिक होता. त्यामुळे एप्रिलमधील पाऱ्याचा उच्चांक मोडला जाणार असे वाटत होते. पण, १० मे नंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण तयार झाले. तसेच वळवाचा पाऊसही पडू लागला. त्यामुळे पारा खालावला आहे.मागील जवळपास १५ दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वळवाचा पाऊस होत आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. परिणामी उकाडाही कमी झाला आहे. सातारा शहरातील तापमान तर ३३ अंशापर्यंत खाली आले आहे. त्याचबरोबर दुष्काळी माण, खटाव, फलटण या तालुक्यात मे महिन्यात कडाक्याचे ऊन असते. पण, सध्या वळीव पाऊस होत असल्याने तेथील पाराही घसरला आहे. यामुळे सर्वांनाच दिलासा मिळालेला आहे. तर लवकरच मान्सूनचा पाऊस सुरू होणार असल्याने तापमानात आणखी उतार येणार आहे.

सातारा शहरात नोंद कमाल तापमान असे..दि. ५ मे ४०.७, ६ मे ४०, ७ मे ३९.१, ८ मे ३९.२, ९ मे ३९.२, १० मे ३६.७, दि. ११ मे ३८.२, १२ मे ३३.४, १३ मे ३६.७, १४ मे ३८.२, १५ मे ३६.७, १६ मे ३७.७, १७ मे ३६.९, दि. १८ मे ३८.५, १९ मे ३८.७, २० मे ३७.८, २१ मे ३८.४, २२ मे ३५.८, २३ मे ३७.२, २४ मे ३६.४ आणि दि. २५ मे ३२.६

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानRainपाऊस