शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा ३८.९ अंश; नवीन वर्षातील उच्चांकी पारा

By नितीन काळेल | Updated: March 26, 2024 19:21 IST

सातारा : सातारा शहरात उन्हाळी झळा वाढल्या असून मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील ...

सातारा : सातारा शहरात उन्हाळी झळा वाढल्या असून मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. त्यामुळे सातारचा पारा लवकरच ४० अंशाचाही टप्पा पार करण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.सातारा शहराचे उन्हाळ्यातील कमाल तापमान ४२ अंशापर्यंत जाते. तर बहुतांशीवेळा पारा हा ४० अंशाच्या आतच असतो. पण, यंदा मार्च महिन्यापासूनच सूर्यदेव कोपू लागला आहे. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातही प्रखर उष्णता जाणवू लागली आहे. सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. तर दुपारी १२ नंतर कडाक्याचे ऊन पडत जाते. परिणामी घराबाहेर पडणेही अवघड होऊन जात आहे. त्यातच मागील चार दिवसांत दररोज पारा वाढत गेला आहे. तीन दिवस तर सातारा शहराचे कमाल हे ३८ ते ३९ अंशादरम्यान राहिले आहे. मंगळवारी ३८.९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. हे या नवीन वर्षातील उच्चांकी पारा ठरला आहे.

सातारा शहर उन्हामुळे तापले असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावर वाहतूकही कमी राहते. तसेच नागरिकही घरातच थांबणे पसंद करतात. त्यामुळे बाजारपेठेत तुरकळक प्रमाणात ग्राहक दिसून येतात. मात्र, सायंकाळी पाचनंतर नागरिक घराबाहेर पडून खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातील पारा सातारा शहरापेक्षा अधिक नोंद होत आहे. यामुळे दुपारच्या सुमारास गावे ओस पडत असल्याचे चित्र आहे. तर ग्रामस्थ दुपारच्या सुमारास एखाद्या झाडाखाली थांबणे पसंद करत आहेत. त्याचबरोबर उन्हाच्या कडाक्यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झालेला आहे. सकाळी ११ पर्यंत आणि सायंकाळी चारनंतर शेतीची कामे उरकण्याकडे कल असतो.सातारा शहरातील कमाल तापमान..दि. १८ मार्च ३५.५, १९ मार्च ३६, २० मार्च ३५.८, दि. २१ मार्च ३६, २२ मार्च ३७, २३ मार्च ३७.२, दि. २४ मार्च ३८.५, २५ मार्च ३८.४ आणि दि.२६ मार्च ३८.९

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान