शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

थंडीची लाट; सातारा-महाबळेश्वरचा पारा ११ अंशापर्यंत घसरला, जनजीवनावर परिणाम

By नितीन काळेल | Updated: January 25, 2024 15:36 IST

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आलीहे असून सातारा आणि महाबळेश्वरचा पारा ११ अंशापर्यंत घसरला आहे. हा या ...

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आलीहे असून सातारा आणि महाबळेश्वरचा पारा ११ अंशापर्यंत घसरला आहे. हा या वर्षातील आतापर्यंतचा नीच्चांकी पारा ठरला आहे. त्यातच वातावरणात शीतलहर कायम असल्याने दिवसाही हुडहुडी भरुन येत असल्याने जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे.नोव्हेंबर महिना थंडीचा असतानाही जिल्ह्याचे किमान तापमान कायम १५ अंशावर राहिले. यामुळे थंडी जाणवलीच नाही. मात्र, डिसेंबर महिन्यांत थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ झाली. डिसेंबरच्या मध्यानंतर सातारा शहराचा पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. तर त्याचवेळी जागितक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरलाही १२ अंशापर्यंत किमान तापमान घसरले होते. यामुळे थंडीचा जोर दिसून आलेला. पण, दोन दिवसांतच थंडी गायब झाली. पुन्हा तापमानात वाढ होत गेली. साताऱ्याचा पारा २० अंशापर्यंत पोहोचलेला. मात्र, जानेवारी महिना उजाडताच थंडीला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली.देशाच्या उत्तर भागातील हरियाणा, पंजाब, उत्तराखंड भागात कडाक्याची थंडी पडत आहे. तसेच उत्तरेत बर्फवृष्टीही होऊ लागली आहे. याच्या परिणामाने महाराष्ट्रातही थंडीची लाट आलेली आहे. सातारा जिल्ह्यात तर मागील १५ दिवसांपासून थंडीची तीव्रता जाणवत आहे. किमान तापमानात उतार येत चालला आहे. त्यातच वातावरणात शीतलहर असल्याने दिवसाही थंडी झोंबत असल्याचे चित्र आहे. तर दोन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा आणखी घसरलाय. यामुळे जिल्हावासियांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागत आहे. याचा परिणाम बाजारपेठेसह शेतीच्या कामावरही झाल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या सुमारास नागरिक घराबाहेर पडत नाहीत. तर शेतकरी दुपारच्या सुमारास शेतीची कामे करत आहेत.सातारा शहराचा पारा आतापर्यंत १५ अंशाच्या दरम्यान राहत होता. मात्र, दोन दिवसांत तापमानात उतार आला आहे. गुरुवारी शहराचा पारा ११.३ अंश नोंद झाला. त्याचबरोबर महाबळेश्वरही गारठले आहे. महाबळेश्वरलाही ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली. सातारा आणि महाबळेश्वरमधील हा पारा आतापर्यंतचा नीच्चांकी ठरला. तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागातही कडाक्याची थंडी आहे. यामुळे गावोगावी शेकोट्या पेटल्या आहेत.

सातारा शहरात नोंद किमान तापमान..दि. १० जानेवारी १८.१, ११ जानेवारी १७.४, १२ जानेवारी १६.१, १३ जानेवारी १५.५, १४ जानेवारी १५.८, दि. १५ जानेवारी १५, १६ जानेवारी १२.४, १७ जानेवारी १३, १८ जानेवारी १२, १९ जानेवारी ११.९, २० जानेवारी १४.६, दि. २१ जानेवारी १४, २२ जानेवारी १४.५, २३ जानेवारी १२, २४ जानेवारी १३ आणि दि. २५ जानेवारी ११.३

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानweatherहवामान