शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढू!, उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलकांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 19:06 IST

जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही

नीलेश साळुंखेकोयनानगर : प्रकल्पग्रस्तांचा लढा १९६२ पासून सुरू असून, छत्रपतींच्या मावळ्यांना लढणे माहिती आहे. प्रशासनाने हुलकावणी दिल्याने आज चौथ्या पिढी न्यायासाठी लढत आहे, या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात आम्ही सोबत असून, त्यांच्या प्रश्नावर खांद्याला खांदा लावून लढू,’ असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिले.कोयनानगर येथील प्रकल्पग्रस्ताच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त करताना ते बोलत होते.यावेळी सुरेश पाटील, गजानन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, राजाराम जाधव, आनंद ढमाल, परशुराम शिर्के, दाजी पाटील, बळीराम कदम, विनायक शेलार, संजय कांबळे, कमल कदम, अक्षय कदम, रामचंद्र कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.हर्षद कदम म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार वेळोवेळी बैठका घेत होते. डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून माहिती घेतली जात असे. मात्र आठ महिने झाले मुख्यमंत्री धरणग्रस्तांना वेळ देत नाही आता धरणग्रस्तांनी आक्रमकपणा धारण केला पाहिजे. इथल्या बेरोजगार तरुणांच्या मतावर लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्यांनी हे काम केले पाहिजे. देशात, राज्यात मोठमोठे प्रकल्प धरणग्रस्तांच्या त्यागातून उभे राहिले आहेत आता संघर्ष अटळ आहे, या लढाईत आम्ही सर्व शिवसैनिक धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.’तालुकाप्रमुख सुरेश पाटील म्हणाले, ‘धरणग्रस्तांना आंदोलनाची वेळ यायला नको होती. आता आंदोलकांनी आक्रमक होऊन शासकीय कार्यालयांना टाळे ठोकल्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही. ठाकरे गट धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी कायम राहील.’ यावेळी गजानन कदम, श्रीपती माने यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या.फुकटचे श्रेय घेऊ नये...धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा गाढा अभ्यास असणारे डॉ. भारत पाटणकर अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लढत आहेत, त्यांचे श्रेय आहे. मात्र कुणी फलकबाजी करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा उपरोधक टोला हर्षद कदम यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्यासाठी पत्र दिले. मात्र जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे धरणग्रस्तांसाठी वेळ नाही. तसेच आता कोणाकडूनही आश्वासन नको कृती हवी. -सचिन कदम, संघटक, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :Satara areaसातारा परिसर