शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

दुचाकीस्वार घसरून ट्रकखाली गेले, सातारचे एसपी मदतीला धावले; दोघा तरुणांचा वाचला जीव

By दत्ता यादव | Updated: November 25, 2023 19:27 IST

सातारा: कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी ...

सातारा: कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवत संबंधित दुचाकीस्वारांना ट्रकखालून बाहेर काढून त्यांचा जीव वाचला. हा अपघात शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत आज, शनिवारी दुपारच्या सुमारास झाला.याबाबत माहिती अशी, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आटोपून पोलिस अधीक्षक समीर शेख हे साताऱ्याकडे यायला निघाले. शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील पिराच्या दर्गाजवळ ते आले असता त्यांच्या समोरच दुचाकीवरील दोघेजण अचानक ट्रकखाली घसरून पडले. यावेळी अधीक्षक शेख यांनी तातडीने गाडीतून खाली उतरून स्वत: मदत करण्यास सुरूवात केली. ट्रकखाली अडकलेल्या दोघा तरूणांना त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या जवान अंकूश यादव, संजय कांबळे, प्रल्हाद ढाकरे,  आकाश निकम, शंकर गायकवाड यांच्या मदतीने ओढून बाहेर काढले. खुद्द पोलिस अधीक्षकच अपघातग्रस्तांना मदत करत असल्याचे पाहून इतर काही जण मदतीसाठी धावून आले. अधीक्षक शेख यांनी जखमींची चौकशी केली असता ते सांगोला आणि बारामतीमधील असल्याची माहिती मिळाली. रोहित साहेबराव बिले (वय २३, रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर), ओंकार दादासो गार्डी (२३, रा. बारामती, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांना ट्रकखालून काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात