शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

मिरजेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन!, स्वाक्षरी अन् इमारत पाहून चिमुकले हरखले

By सचिन काकडे | Updated: November 7, 2023 18:46 IST

सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा नेमकी कशी असेल? त्यांची स्वाक्षरी जवळून पाहता येईल ...

सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा नेमकी कशी असेल? त्यांची स्वाक्षरी जवळून पाहता येईल का? शाळा प्रवेश दिन म्हणजे काय असतं? असे अनेक प्रश्न त्या चिमुकल्यांना पडले होते. अखेर तो दिवस आला अन् मिरजेतील (जि. सांगली) त्या शाळकरी विद्यार्थ्यांनी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आपले पाऊल ठेवले. शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिनाचे महत्त्व जाणून घेतानाच बाबासाहेबांची स्वाक्षरी पाहून हे विद्यार्थी हरखून गेले.७ नोव्हेंबर हा दिवस राज्यात शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर १९०० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे, यासाठी बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली जात होती. या मागणीला मूर्त रूप आले अन् २०१७ पासून राज्य सरकारने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.मंगळवार, दि. ७ रोजी या शाळेत शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा झाला. या दिवसाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी मिरज येथील आदर्श शिक्षण मंदिराच्या तब्बल ८० विद्यार्थी व शिक्षकांनी मंगळवारी या शाळेला भेट दिली. राजेंद्र कांबळे यांनी शाळा प्रवेश दिनाचे महत्त्व सांगितले. तर ‘बार्टी’चे समतादूत विशाल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका स्नेहलता कुरणे नंदिनी काटकर, अश्विनी कोल्हापुरे, कमलाकर मिसाळ, स्वाती केरीपाळे, वृषाली वाटवे उपस्थित होते.

सही जवळून पाहता आली..बाबासाहेबांनी ज्यावेळी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. या शाळेतील जनरल रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच बाबासाहेबांची ही स्वाक्षरी जवळून पाहता आली. सही पाहताना प्रत्येकाचे चेहऱ्यावर कुतूहल दिसून आले. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली शाळेची पुरातन व तितकीच देखणी इमारत विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यात सामावून घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmiraj-acमिरजStudentविद्यार्थी