शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली 

By नितीन काळेल | Updated: December 8, 2023 19:07 IST

सातारा : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे टंचाईत वाढ होत असून आता माणसांच्या बरोबरीने ...

सातारा : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे टंचाईत वाढ होत असून आता माणसांच्या बरोबरीने जनावरेही तहानली आहेत. सध्या ६७ गावे आणि २६५ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून ६१ टॅंकरवर ९७ हजार नागरिक आणि ६९ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांत चांगला पाऊस झाला होता. यामुळे उन्हाळ्यातच टंचाईची स्थिती उद्भवलेली. पण, टंचाईग्रस्त गावांची संख्या जेमतेमच असायची. जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर टॅंकर बंद व्हायचे. पण, यंदा पावसाने जिल्ह्यावरच संकट निर्माण केलेले आहे. सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच बहुतांशी धरणेही भरलेली नाहीत. यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्याचबरोबर टंचाईची समस्या उग्र स्वरुप धारण करत आहे. आताच ६७ गावे आणि २६५ वाड्यांना टॅंकरचा आधार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात भयावह स्थिती निर्माण होणार आहे.माण तालुका दुष्काळी. या तालुक्यात यावर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यापासून सुरू असणारा टॅंकर अजून बंद झालेला नाही. सध्या ३१ गावे आणि २२८ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. यासाठी ३५ टॅंकर सुरू करण्यात आले असून यावर सुमारे ४८ हजार नागरिक अवलंबून आहेत. पांगरी, वडगाव, पाचवड, माेगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हसतनपूर, पळशी, पिंपरी, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, ढाकणी, कारखेल, वाकी, संभूखेड, रांजणी, भालवडी, खुटबाव, मार्डी, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, सुरुपखानवाडी, विरळी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय.खटाव तालुक्यातही टंचाई आहे. ६ गावे आणि ९ वाड्यांसाठी ३ टॅंकर सुरू आहेत. यावर ४ हजार ८६९ नागरिक आणि २ हजार १४० पशुधन अवलंबून आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी या गावांसाठी टॅंकर सुरू करण्यात आलेले आहेत.फलटण तालुक्यातही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील १० गावे आणि २८ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १२ हजार २३६ नागरिकांना टॅंकरचा आधार आहे. तालुक्यात सध्या ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगावमध्येही टंचाईत वाढ झालेली आहे. १९ गावांसाठी १४ टॅंकर सुरू असून त्यावर ३१ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधन अवलंबून आहे. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, होसेवाडी, सिध्दाऱ्थनगर, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक येथे टॅंकरने पाणीपुरवठा होतोय. वाई तालुक्यात एका गावासाठीच टॅंकर सुरू आहे. जिल्ह्यातील खंडाळा, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात टॅंकर बंद आहेत. यावर्षी खंडाळा तालुक्यात उन्हाळ्यातही टॅंकर सुरू नव्हता. 

माणमध्ये माणसांपेक्षा जनावरे अधिक बाधित..जिल्ह्यात टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच पशुधनालाही फटका बसत आहे. माण तालुक्यात ४८ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार आहे. पण, त्यापेक्षा अधिक म्हणजे ५३ हजार पशुधन टंचाईने बाधित आहे. यांनाही टॅंकरच्या पाण्याचाच आधार आहे. फलटणमध्ये ११ हजार जनावरे टॅंकरवर अवलंबून आहेत. त्याचबरोबरच सध्या ११ शासकीय आणि खासगी ५० असे मिळून ६१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. आगामी काळात टॅंकरच्या संख्येत वाढ होणार आहे. तर सध्या १७ विहिरी आणि ३५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळ