शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाउन’; लाडक्या बहिणींची उडाली झोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:43 IST

अंगणवाडी सेविकांचे जागरण; ‘ओटीपी’साठी मध्यरात्री फोनाफोनी

संजय पाटीलकऱ्हाड (जि. सातारा) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म ऑनलाइन भरण्याची सोय आहे. मात्र, ज्या ॲप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे, तेच ॲप ‘सर्व्हर डाउन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. परिणामी, लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे. मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना जागरण करावे लागत आहे, तसेच ‘ओटीपी’साठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागत आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ‘नारीशक्ती’ ॲप उपलब्ध करून दिले. गत चार ते पाच दिवसांपासून मात्र ‘नारीशक्ती’ हे ॲप सुरूच होत नसल्याचे दिसून येत आहे. ॲपवर ‘क्लिक’ करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिलांची झोप उडाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांमार्फतही महिलांना फॉर्म भरता येत आहेत. त्यासाठी सर्व कागदपत्रे सेविकांकडे जमा करायची असून, सध्या हजारो महिलांनी आपली कागदपत्रे सेविकांकडे सुपूर्द केली आहेत. मात्र, ॲप सुरूच होत नसल्याने सेविकांचीही पंचाईत झाली आहे.

रात्री अकरानंतर ‘ऑनलाइन’नारीशक्ती दूत हे ॲप दिवसभरात सुरू होत नाही. काही वेळा रात्री अकरानंतर हे ‘ॲप’ चालते. त्यामुळे अंगणवाडी सेविका रात्री जागरण करून जेवढे अर्ज भरता येतील तेवढे अर्ज भरून घेत आहेत. मात्र, त्यासाठी अर्जदार महिलेला रात्री फोन करून तिच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ‘ओटीपी’ सेविकांना मागावा लागत आहे.

नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन सध्या तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनाही ऑनलाइन अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय. दिवसभर ॲप चालत नाही. रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे. - आनंदी अवघडे, राज्याध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू)

टॅग्स :Satara areaसातारा परिसर