शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण; साताऱ्यातील ‘त्या’ ज्ञानमंदिराला मिळावी ‘आंतरराष्ट्रीय’ झळाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:09 IST

राज्यात हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो

सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात ज्या ऐतिहासिक भूमीतून झाली, त्या सातारा शहरासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांनी येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता.या घटनेला आज १२५ वर्ष पूर्ण होत असून, राज्यात हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून, ज्या शाळेत बाबासाहेबांनी ज्ञानाचे पहिले धडे घेतले, त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून विकसित करावी, हीच बाबासाहेबांना मानवंदना ठरेल, अशी अपेक्षा सातारकरांनी व्यक्त केली.शाळेच्या अभिलेखात आजही ती नोंद..ज्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ आणि जगातला सर्वांत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जाते ते बाबासाहेब प्रतापसिंह हायस्कूलचे विद्यार्थी होते. आजही या शाळेच्या प्रवेश अभिलेखात ‘भीवा रामजी आंबेडकर’ या नावाची १९१४ क्रमांकावर नोंद आहे. प्रवेश घेताना त्या शाळेच्या मातीच्या कणालाही कल्पना नसेल की, हा विद्यार्थी भविष्यात जगातील आदर्श विद्यार्थी ठरेल. पण, बाबासाहेबांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर हे स्वप्न खरे केले. याच मातीतून त्यांना प्रज्ञेच्या आणि विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळ मिळाले आणि आज हे हायस्कूल केवळ सातारकरांचेच नाही, तर या जगाचे प्रेरणास्थान ठरले आहे.हीच खरी मानवंदना ठरेल..२०१७ पासून राज्य सरकारने ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र, आज केवळ हा दिन साजरा करून थांबणे पुरेसे नाही. ज्या आमने बंगल्यात बाबासाहेब राहत होते, त्या वास्तूचे स्मारक उभे करावे. तसेच ज्या शाळेत ते शिकले, त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून विकसित करावे. असे झाल्यास ही शाळा विद्यार्थ्यांसाठी जागतिक प्रेरणास्थान ठरेल आणि हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली खरी मानवंदना ठरेल.

ज्या प्रमाणे देशात शिक्षण दिन, वाचन दिन साजरा केला जातो, त्याप्रमाणे देशात बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हायला हवा. यासाठी शासनाला ७५ लाख पत्रांच्या माध्यमातून साद घातली जाणार आहे. ज्या शाळेत बाबासाहेबांचे शिक्षण झाले ती शाळा आंतराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून विकसित करायला हवी. - अरुण जावळे, प्रवर्तक, शाळा प्रवेश दिन

English
हिंदी सारांश
Web Title : 125 Years of Ambedkar's School Entry: Upgrade Satara School.

Web Summary : Satara celebrates 125 years of Dr. Ambedkar's school admission. Calls grow to develop his school into an international institution as a tribute, honoring his legacy and inspiring future generations. The school's records still hold his entry, symbolizing his profound impact.