शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात बंडखोर दगाफटका करणार की बाजी मारणार, कोणत्या मतदारसंघात काटे की टक्कर.. वाचा

By नितीन काळेल | Updated: November 4, 2024 19:44 IST

नितीन काळेल  सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि महायुतीतील बंडखोरी शमविण्यात चांगलेच यश आले असलेतरी वाई आणि पाटण मतदारसंघात ...

नितीन काळेल सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि महायुतीतील बंडखोरी शमविण्यात चांगलेच यश आले असलेतरी वाई आणि पाटण मतदारसंघात दोघांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे संबंधित कोणाला दगाफटका करणार का, स्वत:च बाजी मारणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष राहणार आहे. तरीही दोन्ही ठिकाणी काॅंटे की टक्कर होणार हे स्पष्ट आहे.राज्यात मागील दोन वर्षांत राजकीय उलथापालथी अनेक घडल्या आहेत. त्याचे पडसाद आताच्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच उमटलेत. महायुती आणि महाविकास आघाडीतून अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. आघाडी तसेच युतीतील अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरले. मनधरणीनंतर काहीजणांनी अपक्ष लढणे स्वीकारले. यामध्ये वाई आणि पाटण मतदारसंघातील बंडखोरी प्रामुख्याने समोर आलेली आहे.वाई मतदारसंघातून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी लढण्याची तयारी केली होती. पण, जागावाटपात मतदारसंघ पक्षाकडे येणार नाही हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही चाचपणी केल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष अर्ज भरला. जाधव यांनी यापूर्वी सातारा लोकसभा तसेच वाई विधानसभेचीही निवडणूक लढवलीय. अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. यामुळे त्यांची उमेदवारी युती की आघाडीच्या उमेदवाराला मारक ठरणार, का तेच बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.पाटण मतदारसंघ आघाडीत उद्धवसेनेकडे गेला. याठिकाणी हर्षद कदम उमेदवार आहेत. तर विरोधात शिंदेसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. पण, याठिकाणी आघाडीतील राष्ट्रवादीतून सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष रिंगणात आहेत. पाटणकर यांचा स्वत:चा गट आहे. या गटाची ताकद त्यांच्या पाठिशी राहील. तसेच आघाडीतील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचीही छुपी ताकद सत्यजित यांना मिळण्याची अटकळ बांधली जात आहे. यामुळे निवडणुकीत पारंपरिकप्रमाणे देसाई आणि पाटणकर यांच्यातच प्रामुख्याने सामना होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४wai-acवाईpatan-acपाटणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024