शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी! कोयनेतील आवक बंद; धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज

By नितीन काळेल | Updated: August 18, 2023 12:41 IST

पावसाअभावी चिंता निर्माण

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा दिवसांपासून पावसाची दडी असल्याने धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यातच कोयना धरणात दोन दिवसांपासून आवक बंद झाली आहे. त्यामुळे सध्या ८४ टीएमसीच पाणीसाठा आहे. अजुनही धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज आहे. मात्र, पावसाअभावी चिंता वाढली आहे.पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच दमदार पाऊस झाला. यामुळे गेल्या दीड महिन्यात धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसह कोयना धरणात चांगला पाणीसाठा वाढला. पण, मागील दहा दिवसांपासून बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. धरणक्षेत्रातही अत्यल्प पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली आहे. परिणामी पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत नाही. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ९ तर नवजा येथे १३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर महाबळेश्वरला ३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३२६९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला ४३५५ आणि सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ४६४७ मिलीमीटर पडलेला आहे.यंदा या भागात पावसाचे प्रमाण चांगले राहिले असलेतरी धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. कारण, प्रमुख धरणे भरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ आहे. सध्या या धरणात ८४.१० टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच दोन दिवसांपासून धरणातील आवक बंद आहे. हे धरण भरण्यासाठी अजून २१ टीएमसी पाणी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण