शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला, शेतकरी चिंताग्रस्त

By नितीन काळेल | Updated: August 29, 2023 17:23 IST

सातारा : जिल्ह्यात हळूहळू लम्पी बाधित पशुधनाचा आकडा वाढत चालला असून आता खटाव तालुक्यातही बाधा पोहोचली आहे. त्यामुळे  फलटण, ...

सातारा : जिल्ह्यात हळूहळू लम्पी बाधित पशुधनाचा आकडा वाढत चालला असून आता खटाव तालुक्यातही बाधा पोहोचली आहे. त्यामुळे  फलटण, कऱ्हाड, मान आणि कोरेगावसह पाच तालुक्यात लम्पी पोहाेचलाय. तर पशुसंवर्धन विभागाने ३ लाख ४२ हजार जनावरांना लसीकरण केले आहे. यामुळे ९७ टक्के लसीकरण करण्यात यश आलेले आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या आॅक्टोबर ते यंदाच्या मार्च महिन्यादरम्यान लम्पीच्या पहिल्या टप्प्यात बाधित पशुधनाचा आकडा मोठा होता. जवळपास २० हजारांहून अधिक पशुधनाला या रोगाने गाठले होते. तर १४८९ जनावरांचा मृत्यू झालेला. मात्र, मार्च महिन्यानंतर लम्पीचा धोका कमी झाला होता. यामुळे शेतकऱ्यांबरोबर प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला होता. चार महिने जिल्हा लम्पीपासून दूर राहिला. पण, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात लम्पीचा कहर वाढलाय. सातारा शेजारील सोलापूर जिल्ह्यातही बाधित जनावरांचे प्रमाण आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यालाही धोका निर्माण झालेला. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने गोवंशीय जनावरांना लसीकरण सुरू केले आहे. ३ लाख ५२ हजार जनावरांना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार ५१८ पशुधनाला लस देण्यात आली आहे. उर्वरित जनावरांनाही लवकरच लस देण्यात येणार आहे.  बाधित जनावरात ११ ने वाढ... सातारा जिल्हा शेजारील सोलापूर जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद केले आहेत. सातारा जिल्ह्यातील हळूहळू बाधित जनावरांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गोवंशीय जनावरांचे बाजार बंद केले आहेत. तसेच बैलगाडा शर्यतीही होणार नाहीत. तर सोमवारपर्यंत जिल्ह्यात ४१ जनावरांना लम्पी झाल्याचे दिसून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला होता. मंगळवारी लम्पी बाधित पशुधन संख्या ११ ने वाढून ५२ वर पोहोचली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग