शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींची वारी.. स्वागताला सजली लोणंदनगरी !, आज नीरा स्नान; वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:58 IST

भक्तीच्या या अगाध सोहळ्यासाठी अवघी लोणंदनगरी आतुरली

सातारा : विठूरायाच्या भेटीची आस मनात घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा गुरुवारी (दि. २६) सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. भक्तीच्या या अगाध सोहळ्यासाठी अवघी लोणंदनगरी आतुरली असून, जिल्हा प्रशासनदेखील माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला परंपरेची किनार आहे. दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्यात नि:स्वार्थ भावनेने सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने चालत असतात. वैष्णवांचा हा मेळा गुरुवारी महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हे नगरीचा निरोप घेऊन साताऱ्यात दाखल होणार आहे. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड असा विसावा घेत हा सोहळा दि. ३० जुलैला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.पालखी सोहळ्याचा वारीतील पहिला मुक्काम लोणंदनगरीत असल्याने माऊलींच्या स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज झाली असून, प्रशासनाकडूनही स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याचे गमन व स्वागत करण्यासाठी मौजे पाडेगाव येथे स्वागत मंडप उभारण्यात आला आहे. तसेच पालखी विसावा, पालखी तळाची स्वच्छता करण्यात आली आहे.पालखी मार्गाची डागडुजी करून वारकऱ्यांची वाट सुकर करण्यात आली आहे. ठिकठिकाणी फिरते स्वच्छतागृह, पाणी, वीज, आरोग्य अशा पायाभूत सेवांची पूर्तता करण्यात आली आहे. वारकरी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस दलाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम असा

  • गुरुवारी (दि. २६) माऊलींचा पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावणार आहे.
  • शुक्रवारी (दि. २७) दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगाव येथे होईल.
  • शनिवारी (दि. २८) काळज, निंभोरे, वडजल असा पाहुणचार घेत हा सोहळा फलटण विमानतळावर विसावा घेईल.
  • रविवारी (दि. २९) सकाळी विडणी, पिंपरद, निंबळक फाटा करत पुढे बरड येथे मुक्कामी जाईल.
  • सोमवारी (दि. ३०) वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.

सीसीटीव्ही अन् डिजिटल स्क्रीनलोणंद नगर पंचायतीकडून पालखी सोहळ्यासाठी ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच वारीतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ज्या भाविकांना माऊलींच्या पालखीचे, पादुकांचे दर्शन घेता येणार नाही, अशा भाविकांना पादुकांचे ऑनलाइन दर्शन घेता यावे, यासाठी तीन ठिकाणी डिजिटल स्क्रीन बसविण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्जपालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी मुक्कामाच्या चारही ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.