शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल, यावर सकारात्मक चर्चा करावी - मुख्यमंत्री शिंदे 

By दीपक देशमुख | Updated: February 24, 2024 15:43 IST

मराठा समाजाने संयम बाळगावा

सातारा : मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही, असे काहीजण सांगत आहेत. परंतु, का टिकणार नाही, याची कारणे मात्र ते देत नाहीत. वास्तविक आरक्षण कसं टिकेल यावर सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. हातात संधी होती, त्यावेळी त्यांनी संधीचे सोने केले नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण मागतोय. या समाजाला आरक्षण देण्यासाठी चार लाख कर्मचाऱ्यांची टीम लावली. दिवसरात्र काम केले. सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली, ज्या त्रुटी सांगितल्या त्या पुर्ण दूर केल्या. अभ्यासपूर्ण सर्व्हेक्षणातून मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागसलेपण सिद्ध केले. यासाठी तज्ज्ञ लोकांनी मेहनत घेतली. मराठा समाजाच्या लढ्यास यश मिळाले आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या टिकेल, असाच निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ३८१ कोटी निधी दिला आहे. प्रतापगडाचे संवर्धन करून शिवकालीन प्रतागपड जसा होता तशाच प्रकारे जतन केले जाणार आहे. क्षेत्र महाबळेश्वरातही पर्यटनाचे प्रकल्प घेतले आहेत. या भागातील तरूण नोकरीसाठी बाहेर न जाता येथे त्यास नोकरी मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. उदयनराजे यांच्यावर प्रतापगडची जबाबदारी सोपवणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाने संयम बाळगावामनाेज जरांगे आजपासून आंदोलन करणार आहेत, याबाबत छेडले असता एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजासाठी सरकारने कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम केले आहे. यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने तेलंगणा हैद्राबादपर्यंत काम करत आहे. समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उर्वरित लोकांसाठी दहा टक्के आरक्षण दिले आहे. यामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यांत मराठा समाजाला न्याय मिळेल. सरकार पूर्णपणे सकारात्मक असून मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

उदयनराजेंसाठी शब्द टाकणार काय ?खा. उदयनराजें यांच्या उमेदवारीसाठी शब्द टाकणार, असे विचारले असता महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, सर्व तुमच्यासमोर कसे कसे सांगू असे म्हणत वेळ मारून नेली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे