सातारा : सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, ते सर्वांनी वाटून घेऊ, असे म्हणत एका वृद्धेचे गळ्यातील सुमारे दोन लाखांचे अडीच तोळ्यांचे गंठण चोरून नेले. ही घटना ७ रोजी सकाळी ११ वाजता राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोलपंपासमोर घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताबाई भाऊ देवकर (वय ६०, रा. देवकरवाडी, निगडी, ता. सातारा) या कदम पेट्रोल पंपासमोरून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी तीन तरुण त्या ठिकाणी आले. देवकर यांना त्यांनी सोन्याचे बिस्कीट सापडले आहे. ते आपण सगळ्यांनी वाटून घेऊ, पण तुमच्या गळ्यातील गंठण काढून द्या, असे सांगितले. त्यानंतर देवकर यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण काढून दिले. यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले. देवकर यांनी ९ रोजी या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद असून, हवालदार मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
Web Summary : In Satara, thieves posing as good samaritans stole an elderly woman's gold necklace worth ₹2 lakhs by falsely claiming to share a found gold biscuit. Police are investigating the incident that occurred near Kadam Petrol Pump.
Web Summary : सतारा में, धोखेबाजों ने सोने का बिस्कुट मिलने का झूठा दावा करके एक वृद्ध महिला से ₹2 लाख का सोने का हार चुरा लिया। पुलिस कदम पेट्रोल पंप के पास हुई घटना की जांच कर रही है।