शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खंबाटकीचा नवीन सहा-पदरी बोगदा मार्च २३ पर्यंत पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 22:05 IST

खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट संदेश गडकरी यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली.

खंबाटकी घाटाच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देणारा ट्विट संदेश गडकरी यांनी केला आहे. यानुसार पुणे-सातारा या राष्ट्रीय हामार्ग क्र. ४ वर सद्या प्रत्येकी ३ मार्गिका असलेल्या दुहेरी बोगद्याचे कार्य सुरु असून इंग्रजीवर्णाक्षर 'एस' प्रमाणे असलेल्या वळणमार्गाचे कामही लवकरच पूर्ण होईल. यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी घट होईल.

खंबाटकीच्या नवीन दोन स्वतंत्र बोगदे दुहेरी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असून यामध्ये वाहनचालकांच्या सोयीसाठी आधुनिक एलईडी लाईट, व्हेंटीलेशनसाठी सिलिंग डक्ट फॅन, अग्निशमन व्यवस्था, व्हिडीओ नियंत्रण सुविधा व बोगदा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक वळविण्यासाठी दोन्ही बोगदे प्रत्येक ४०० मीटरवर क्रॉस लेनने जोडण्यात येणार आहेत.

खंबाटकीचा नवीन बोगदा मार्गाचे वेळे ते खंडाळा असा सुमारे ६. ३ किलोमीटरचा नवीन सहापदरी रस्ता बनवला जात आहे. यामध्ये दोन्ही बोगदे ११४८ मीटर लांबीचे राहणार आहेत. त्याची रुंदी १६. १६ मीटर व सुमारे ९. ३१ मीटर उंच असणाऱ्या या बोगद्यामध्ये प्रत्येकी तीन लेनचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. बोगद्यातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी रस्ताही ठेवला जाणार आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार होत आहे .

पुणे-सातारा आणि सातारा-पुणे कडील प्रवासासाठी या बोगद्यातून लागणारा प्रत्येकी ४५ मिनिटे आणि १० ते १५ मिनिटांच्या वेळेत घट होवून केवळ ५ ते १० मिनिटात या बोगद्यातून प्रवास करता येईल. ६. ४३ कि. मी. लांबीच्या या प्रकल्पासाठी अंदाजे ९२६ कोटी रुपये खर्च येणार आहे.चौकट

कर्दनकाळ वळण निघणारखंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस वळणाचा धोका काढण्यासाठी सुधारित रस्त्याचे काम सुरु आहे . शेकडो प्रवाशांचा बळी घेणारे हे वळण निघणार असल्यामुळे बोगदा पूर्ण झाल्यावर येथून दुहेरी वाहतुक सुरू होईल शिवाय रस्ता सरळ झाल्याने अपघातांची मालिका खंडित होईल

टॅग्स :Satara areaसातारा परिसर