शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Satara- थकबाकीदारांची नावे फलकावर झळकणार, रहिमतपूर पालिका ॲक्शन मोडवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:19 IST

कर भरणा करा अन् फ्लेक्सवरील नावे टाळा..

जयदीप जाधवरहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषदेने करवसुलीसाठी सातत्याने मोहीम राबविली आहे. तरीही अद्याप बत्तीस टक्के थकबाकी असल्याने नाईलाजाने पालिका प्रशासनाने थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्डवर लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या चार दिवसांत थकबाकीदारांची नावे चौकामध्ये फ्लेक्स बोर्डवर झळकणार आहेत.रहिमतपूर पालिका प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी आठ वसुली पथकांच्या माध्यमातून जोरदार वसुली मोहीम राबवली. वसुलीदरम्यान कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकी दारावर वेळोवेळी कारवाईचा दंडुका उगारला. वसुली मोहिमेदरम्यान तब्बल १३० नळ कनेक्शन तोडण्यात आली असून, सुमारे १२५ मिळकतदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिसा मिळाल्यानंतर काही थकबाकीदारांनी पूर्ण थकीत रकमेचा भरणा केला असून, काहींनी थकित रकमेपैकी काही रक्कम भरल्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली नाही.२९ मार्चअखेर पालिकेची ६८ टक्के कर वसुली झाली आहे. पालिकेच्या घरपट्टी पाणीपट्टीच्या एकूण तीन कोटी ६९ लाख ९ हजार रुपये करापैकी सुमारे दोन कोटी ४२ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. परंतु सुमारे एक कोटी २७ लाख ६१ हजार रुपये अद्याप येणे बाकी आहे. म्हणजेच अद्याप बत्तीस टक्के करवसुली बाकी आहे.रहिमतपूर शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी कर वसुली शंभर टक्के असणे गरजेचे आहे. परंतु सातत्याने थकित कराची मागणी करूनही थकबाकीदार जुमानत नसल्यामुळे नाईलाजाने थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. हे फ्लेक्स गावातील चौकाचौकांमध्ये ठेवले जाणार आहेत.

कर भरणा करा अन् फ्लेक्सवरील नावे टाळा..रहिमतपूरच्या चौकामध्ये लावलेल्या फ्लेक्सच्या माध्यमातून मिळकतदारांची सर्वांसमोर जाहीर होणारी नावे रोखण्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने विनाविलंब कर भरणा पालिकेमध्ये करावा, अन्यथा पालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या चार दिवसांत केली जाणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी तथा प्रशासक संजीवनी दळवी यांनी दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर