शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईला विषारी सापाने केला दंश, तरीही मुलाने सापाच्या अकरा पिलांना दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 18:31 IST

आई सर्पदंशातून बचावली आहे अन् सापाची अकरा पिलंही नैसर्गिक अधिवासात सोडल्याचा दुहेरी आनंद

कोयनानगर : विषारी सापाने दंश केल्यामुळे आई जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. हे समजल्यावर पुण्यात असलेल्या मुलाने वन्यजीव रक्षक मित्राला जाऊन पाहण्यास सांगितले. तेव्हा घोणस या विषारी सापाने दंश केल्याचे लक्षात आले. मात्र, आई सुखरूप असल्याचे मित्राने मुलाला फोन करून सांगितले. त्याचवेळी घरी जाऊन शोध घेतला असता अकरा पिलं आढळून आली. त्यांना सर्पमित्राने सुरक्षितस्थळी सोडले.याबाबत माहिती अशी की, आंब्रग येथील छाया बबन निकम यांना गुरुवार, दि. १६ रोजी पहाटे चारच्या सुमारास त्या झोपेत असताना घोणस सापाच्या पिलाने दंश केला. हे लक्षात आल्यावर छाया निकम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ही माहिती त्यांचा मुलगा सर्पमित्र अक्षय निकम यांना समजली. तेव्हा ते पुण्यामध्ये होते. त्यांनी तत्काळ कोयनानगर येथील वन्यजीव अभ्यासक व रक्षक विकास माने यांना जन्मलेल्या पिलाने दंश केला. त्यामुळे त्यांना तत्काळ सातारा येथील वन्यजीवरक्षक सुमित वाघ यांना रुग्णालयात जाऊन परिस्थिती पाहण्यास सांगितले.सुमित वाघ वेळ न घालवता रुग्णालयात पोहोचले. घोणस सापाच्या पिलाचा दंश झाला असून, व्यवस्थित उपचार सुरू असल्याचे कळवले. घोणस सापाचे पिलू असल्याचे समजताच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला घोणस सापाची मादी ८ ते ६४ पिलांना जन्म देते. यामुळे आणखी पिलं असल्याचा संशय बळावत होता. अक्षय यांनी घरी जाऊन आणखी पिलं आहेत का, याचा शोध घ्यायचं ठरवलं व त्यांनी आंब्रग येथील घरी जाऊन घरामध्ये आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना अकरा पिलं मिळाली. अक्षय यांनी त्या पिलांना सुरक्षितस्थळी सोडून कर्तव्य पार पाडले.यावेळी मल्हारपेठ येथील वन्यजीवरक्षक विनायक कदम, मोरगिरी येथील वन्यजीवरक्षक अक्षय हिरवे, कोयनानगर येथील वन्यजीवरक्षक दत्ता कांबळे, विकास माने यांनी अक्षय निकम यांच्या घरी भेट देऊन परिसरात पाहणी केली.आई सुखरूप... पिलंही सुरक्षितमी लहानपणासून शेकडो साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत. सध्या नोकरीनिमित्ताने पुण्यात आहे. त्या ठिकाणीही साप पकडत आहे. आई सर्पदंशातून बचावली आहे अन् सापाची अकरा पिलंही नैसर्गिक अधिवासात सोडल्याचा दुहेरी आनंद आहे. आणखी पिलं असण्याची शक्यता असून, आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती सर्पमित्र अक्षय निकम यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर