शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सातारा गारठला, दीड महिन्यानंतर हुडहुडी वाढली

By नितीन काळेल | Updated: December 15, 2023 13:12 IST

या वर्षातील हे नीच्चांकी तापमान

सातारा : जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यानंतर थंडीची तीव्रता वाढत चालली असून यंदा प्रथमच शुक्रवारी सातारा शहराचा पारा १३ अंशापर्यंत खाली आला. त्यामुळे नागरिकांनी हुडहुडी भरुन राहिली. तर ग्रामीण भागात चांगलाच गारठा वाढल्याचे दिसून आले.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. हळूहळू थंडीची तीव्रता वाढत जाते. गेल्यावर्षी तर ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीला सुरूवात झाली होती. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच गारठा जाणवला. यामुळे शहरासह ग्रामीण भागही गारठला होता. यंदा मात्र, थंडीला उशिरा सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी जाणवली. तसेच डिसेंबर महिना उजाडला तरी तीव्रता नव्हती. मात्र, मागील चार दिवसांत हवेत थंड लहर होती. तसेच हवामान विभागानेही थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार थंडीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच बहुतांशी ठिकाणचा पारा १५ अंशाच्या खाली गेला आहे. सातारा शहरात तर शुक्रवारी १३.२ अंशाची नोंद झाली. गेल्या दीड महिन्यातील हे नीच्चांकी तापमान ठरले आहे. यामुळे वातावरणात गारवा वाढला असून नागरिकांना ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. तर ग्रामीण भागातही थंडीचा परिणाम जाणवणार आहे. शेतीच्या कामावर याचा परिणाम होऊ शकतो. तर यावर्षी आतापर्यंत थंडी कमी असल्याने शेकोट्याही पेटल्या नव्हत्या. पण, आता यापुढे थंडीत वाढ झाल्यास शेकोट्यांना सुरूवात होणार आहे.दरम्यान, जागतिक पर्यटनस्थळ व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पाराही खालावला आहे. आतापर्यंत १४ ते १५ अंशापर्यंत तेथील नीच्चांकी पारा होता. आता त्यामध्ये वाढ होत चालली आहे. शुक्रवारी तर महाबळेश्वरमध्ये १२.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. या वर्षातील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर यामुळे थंडीची तीव्रता चांगलीच जाणवली.

सातारा शहरातील नोंद किमान तापमान..दि. १ डिसेंबर २०.०१, २ डिसेंबर १६.०१, ३ डिसेंबर १५.०८, ४ डिसेंबर १५.०९, ५ डिसेंबर १५.०२, दि. ६ डिसेंबर १५.०२, ७ डिसेंबर १३.०६, ८ डिसेंबर १४.०३, ९ डिसेंबर १४.०७, १० डिसेंबर १५.०५, दि. ११ डिसेंबर १५, १२ डिसेंबर १५.०५, १३ डिसेंबर १४.०४, १४ डिसेंबर १३.०५ आणि दि. १५ डिसेंबर १२.०५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान