शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रुग्णालयात केली तोडफोड, साताऱ्यातील फलटण येथील घटना; गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 19:14 IST

संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तवणुकीमुळे सर्व कर्मचारी वैतागले

नसीर शिकलगारफलटण : वादग्रस्त वागणे असलेल्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची दारे खिडक्यांची तोडफोड केल्याची घटना घडली. मात्र याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकारामुळे उपजिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली.गेल्या चार वर्षापासून फलटण उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरु आहे. अनेक वेळा रुग्णालयाच्या कारभाराबाबत तक्रार करून देखील याची दखल घेतील जात नाही.  चार वर्षांपूर्वी या रुग्णालयात बदलून आलेल्या संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तवणुकीमुळे सर्व कर्मचारी वैतागले आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणे, कामावर कधी तरी येणे असे वागणे संबंधित अधिकाऱ्याचे आहे.काल रात्री संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने शिमगा करीत उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची तोडफोड केली. विक्षिप्त स्वभावाच्या या अधिकाऱ्याला सर्वजण वैतागले असून रुग्णालयातील महिला कर्मचारी व रुग्ण भीतीने ग्रासले गेले आहेत. शासकीय मालमत्तेची तोडफोड करून सुद्धा याप्रकरणी अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. 

गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयाची तोडफोड केल्याने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल