शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘फाशीच्या वडा’खाली शिकवला विद्यार्थ्यांना हुतात्म्यांचा धडा, साताऱ्यातील रा. ब. काळे शाळेचा अनोखा उपक्रम

By सचिन काकडे | Updated: September 9, 2023 14:01 IST

सातारा : फाशीचा वड हे साताऱ्यातील एक ऐतिहासिक, क्रांतिकारी ठिकाण. याच ठिकाणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिशांनी १७ पैकी ...

सातारा : फाशीचा वड हे साताऱ्यातील एक ऐतिहासिक, क्रांतिकारी ठिकाण. याच ठिकाणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिशांनी १७ पैकी पाच क्रांतिकारकांना फाशी दिली, सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले, तर सहा जणांना गोळ्या घातल्या होत्या. रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. काळे प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना या प्रेरणास्थळी घेऊन जाऊन ‘ते अमर हुतात्मे झाले’ या कवितेचे वाचन करण्याचा अनोखा उपक्रम राबविला.शिक्षिका आशा वाघमोडे यांच्याकडे इयत्ता तिसरीचा वर्ग आहे. याच वर्गातील भाषा विषयात ‘ते अमर हुतात्मे झाले’ ही कविता आहे. वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना ही कविता वर्गात न शिकवता हुतात्मा स्मारक येथे शिकवण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनीही या कल्पनेचे स्वागत केले.

शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळा भरली. मात्र, शिक्षिका वाघमोडे यांनी इयत्ता तिसरीचा वर्ग दप्तरासह फाशीचा वड म्हणजेच हुतात्मा स्मारक येथे नेला. येथे जाऊन त्यांनी प्रथम हुतात्मा स्मारकाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. क्रांतिकारकांना फाशी कशी दिली होती, त्यांना तोफेच्या तोंडी कसे दिले होते, गोळ्या कशा घातल्या गेल्या याची माहितीही विद्यार्थ्यांनी चित्ररूपात जाणून घेतली. हे सर्व दृश्य पाहून विद्यार्थी भावुक झाले. त्यानंतर शिक्षिका वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना याच ठिकाणी ‘ते अमर हुतात्मे झाले’ ही कविता शिकवली.

कविता शिकताना विद्यार्थी शहारून गेले. हुतात्म्यांचे बलिदान त्यांच्या लक्षात आले. या बलिदानामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले हे त्यांना चांगलेच समजले. प्रत्यक्ष फाशीच्या वड, हुतात्मास्तंभ यांच्या सान्निध्यात शिकलेली ही कविता विद्यार्थ्यांच्या सदैव स्मरणात राहील. - आशा वाघमोडे, शिक्षिका

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा