शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

अज्ञातांनी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटाच केल्या लंपास, पाटण तालुक्यातील निसरेमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:43 IST

कऱ्हाड : निसरे, ता. पाटण येथील बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या लोखंडी प्लेटांपैकी ९१ प्लेटा चोरीस गेल्यामुळे संताप व्यक्त ...

कऱ्हाड : निसरे, ता. पाटण येथील बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या लोखंडी प्लेटांपैकी ९१ प्लेटा चोरीस गेल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. प्लेटाच चोरीस गेल्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा होणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.निसरे येथे शेतीला पाणी पुरवठा होण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी प्लेटा लावण्यात आल्या आहेत. १ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाचे कामगार पोपट चव्हाण हे बंधाऱ्याचे काम पाहण्यासाठी बंधाऱ्याजवळ गेले होते. त्यावेळी सर्व प्लेटा बंधाऱ्या जवळ व्यवस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र त्यानंतर ८ एप्रिल रोजी पुन्हा बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना बंधाऱ्याजवळ लोखंडी प्लेटा कमी असल्याचे आढळून आले.त्यांनी पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी विश्वास कुलकर्णी यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी संबंधित अधिकारी व कामगार यांनी मिळून बंधाऱ्यानजीकच्या प्लेटांची मोजणी केली असता १ हजार १६२ प्लेटांपैकी ९१ प्लेटा चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.प्लेटा चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर शाखा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली. १८ हजार २०० रुपये किमतीच्या एकूण ९१ प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत पाटबंधारे विभागाचे मोजणीदार शांताराम दाजी चाळके यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर