शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची दाहकता वाढल्याने जीवाची घालमेल, सातारा जिल्हात पारा ४० अंशाच्या उंबरठ्यावर

By नितीन काळेल | Updated: March 18, 2025 19:50 IST

मार्चच्या मध्यावरच दाहकता; उकाड्याले घालमेल 

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून सातारा शहराचा पारा यंदा प्रथमच ४० अंशाच्या उंबरठ्यावर पोहोचला. मंगळवारी ३९.२ अंशाची नोंद झाली. तर पूर्व माण, खटाव तालुक्यातील कमाल तापमानाने ४० अंशाचा टप्पाही पार केला आहे. यामुळे मार्च महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्यात उन्हाची दाहकता वाढल्याने जीवाची घालमेलही वाढली आहे.जिल्ह्यात यावर्षी हिवाळ्यात थंडी अधिक प्रमाणात जाणवलीच नाही. पण, उन्हाळ्याला लवकर सुरूवात झाली. कारण फेब्रुवारीतच जिल्ह्यातील कमाल तापमान ३५ अंशावर गेले होते. तर मार्च महिना सुरू झाल्यानंतर उन्हाची तीव्रता आणखी वाढली. त्यामुळे मागील आठवड्यात दोनवेळा सातारा शहराचा पारा ३८ अंशावर गेलेला. तसेच थंड हवेच्या महाबळेश्वरचाही पारा वाढला. तर जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे माण, खटाव, फलटण हे तालुके. या दुष्काळी तालुक्यातही उन्हाचा कडाका आहे. मागील काही दिवसांत तर दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अशातच मंगळवारी जिल्ह्यातच यावर्षीच्या आतापर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली.

सातारा शहराचा पारा मार्च महिन्यात आतापर्यंत ३८.५ अंशापर्यंत पोहोचला होता. पण, मंगळवारी कमाल तापमानाने ३९ अंशाचा टप्पार पार केला. साताऱ्यात ३९.२ अंशाची नोंद झाली. त्यामुळे लवकरच साताऱ्याचा पारा ४० अंशाचाही टप्पा पार करण्याचा अंदाज आहे. तर पूर्व भागातील कमाल तापमान ४० अंशावर पोहोचले आहे.

मंगळवारीही दुपारी कडक ऊन पडलेले. यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सोसण्याची वेळ लोकांवर आलेली. त्याचबरोबर उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील रस्तेही ओस पडू लागलेत. शहरातील रस्त्यावरही दुपारच्या सुमारास गर्दी कमी जाणवत आहे. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढलेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान