शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच; कोयनेत ४० टीएमसीवर साठा

By नितीन काळेल | Updated: July 21, 2023 12:36 IST

महाबळेश्वरला १०३ मिलीमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरलाच सर्वाधिक १०३ मिलमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठ्याने ४० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. सध्या पावसाचा जोर कमी ओसरला असलातरी झाडे पडणे, दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजा भागात सोमवारपासून पावसाचा जोर वाढत गेला. तर मंगळवारी आणि बुधवारी धुवाॅधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी ३०० मिलमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यातच या जोरदार पावसामुळे कोकणला जोडणाऱ्या कुंभार्ली आणि पोलादपूरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. तसेच महाबळेश्वर-तापोळा मार्गावरही दरडी कोसळली होती. तर इतर काही मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद झालेली. यामुळे मागील तीन दिवस पश्चिम भागात अडचणींचा सामना करावा लागलेला.मात्र, गुरुवारपासून पाऊस कमी होत गेला आहे. आज, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८४ मिलमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ९५ आणि महाबळेश्वरला १०३ मिलमीटरची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा महाबळेश्वरमध्ये २३३२ आणि नवजाला २३३१ मिलीमीटर पडला. तर कोयनेला १६४४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तरीही यावर्षी कोयनेला पाऊस कमी आहे. दरम्यान, या पावसामुळे पश्चिम भागातील ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. तसेच भात खाचरातही पाणी साचले आहे. यामुळे भात लागणीला वेग आला आहे.

कोयनेत आवक कमी...कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी होत चालली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ३७ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणसाठा ४०.७८ टीएमसी झाला होता. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.

महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरड...पश्चिम भागातील महाबळेश्वर-तापोळा मार्गावर गुरुवारी दरड पडली होती. यामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला. मात्र, प्रशासनाने युध्दपातळीवर काम करुन दरड हटविली. त्यामुळे रस्ता वाहतुकीस खुला झाला. तसेच याच मार्गावर वाघोरा येथे झाडही रस्त्यावर पडलेले. तेही बाजुला काढण्यात आले आहे. महाबळेश्वरजवळील प्रतापगड रस्त्यावर पडलेली दरडही काढून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसlandslidesभूस्खलनKoyana Damकोयना धरण