शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आढळला दुर्मीळ बेडूक तोंड्या पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 18:03 IST

श्रीलंकन फ्रॉग माऊथ किंवा बेडूक तोंड्या या शिकारी पक्ष्याचा आवास साताऱ्यातील जंगलात

सातारा : सातारा भागातील जंगल अत्यंत वैविध्यपूर्ण असून त्यामध्ये असणाऱ्या प्राणी व पक्षांचा आवास हा निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यावरच येथील अन्नसाखळी व निसर्ग साखळी अवलंबून आहे. साताऱ्यातील जंगलांमध्ये सर्व शिकारी पक्षी आढळून येतात. श्रीलंकन फ्रॉग माऊथ किंवा बेडूक तोंड्या या शिकारी पक्ष्याचा आवास साताऱ्यातील जंगलात आढळून आला आहे.हे पक्षी मुख्यत्वे कोकण भागात तसेच कोयना परिसरात आढळून येतात. सातारा भागातून याची नोंद नव्हती. अनेक वर्षे शोध घेत असताना मार्च महिन्यात या पक्षाच्या आवाजावरून याला शोधण्यात सागर कुलकर्णी यांना यश आले व सातारा भागातील जंगलाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. हे पक्षी घुबडासारखे वाटत असले तरी ते रातवा या पक्ष्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. यांच्या आहाराचे छोटे उंदीर, बेडूक, साप, सापसुरळ्या, छोटी वटवाघळे आणि काही कीटक यांचा समावेश आहे.नर अत्यंत गडद रंगात, तर मादी तांबूस रंगात आढळून येते. वाळलेल्या पानांमध्ये झाडावर हे लपून जातात. निशाचर असल्याने रात्री यांची हालचाल पाहायला मिळते. तसेच बेडूक तोंड्या हे डिसेंबर महिन्यात घरटे करून दोनपर्यंत पिल्लांचे संगोपन करतात. अत्यंत अशा दुर्मीळ पक्षाचा वावर आपल्या जंगलात आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच या सर्व जंगलांचे सरंक्षण होण्याची मागणी निसर्गमित्रांकडून केली जात आहे.

भटकंतीच्या निमित्ताने विविध पक्षी आणि प्राणी आढळून येतात. असाच हा दुर्मीळ पक्षी जंगलातील भटकंतीत आढळून आला. सह्याद्रीच्या पर्वत रांगात असे अनेक पक्षी आढळतात. - श्रीकांत वारुंजीकर, निसर्गमित्र.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर