शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने बांधून ठेवलंय धरण; धरणामुळे झालंय आमचं मरण!, कोयना धरणग्रस्त महिलांनी मांडली व्यथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 16:12 IST

‘मायबाप सरकार तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन ६४ वर्षांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावा,’ अशी आर्त हाक

कोयनानगर : काळजाचं होतंय पाणी पाणी, धरणग्रस्तांची ऐकून कहाणी, ‘बाई मी धरण धरण बांधते, माझं मरण मरण कोंडते, शासनाने बांधून ठेवलंय धरण, धरणामुळे झालंय आमचं मरण,’ अशा विविध स्फूर्तिगीतांनी रविवारी कोयना नदीकाठावरील आंदोलनस्थळ परिसर दुमदुमून गेला होता.श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली कोयनानगर येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच असून, रविवारी आंदोलनाचा १४वा दिवस होता. मात्र, या आंदोलनाची अद्यापही शासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलक धरणग्रस्त गीतांतून गाऱ्हाणे मांडत सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. कोयना नदीकाठावरील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर कोयनेसह वांग-मराठवाडी, तारळी, उरमोडी प्रकल्पाचे धरणग्रस्त हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. धरणग्रस्तांचा उत्साह वाढवत प्रकल्पामुळे झालेल्या स्थितीचे वर्णन धरण स्फूर्तिगीतांतून सरकारकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. ‘मायबाप सरकार तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन ६४ वर्षांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावा,’ अशी आर्त हाक धरणग्रस्त महिला-भगिनी या गीतांतून देत आहेत. गत चौदा दिवस घर, संसार सोडून दिवसरात्र न्याय मागण्यासाठी बसलेल्या प्रकल्पग्रस्तांकडे लक्ष देत नाही, असा आरोप आंदोलन धरणग्रस्त करत आहेत. दरम्यान, रविवारी कोयना विभागातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोयनामाई सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत मोहिते, पंकजनाना गुरव, सचिन कदम, श्रीपती माने, महेश शेलार, दाजी पाटील, सीताराम पवार, राजाराम जाधव, संदीप जांभळे, अनिल सुतार, परशुराम शिर्के, आकाश कांबळे यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते. वनविभागाच्या कार्यालयावर आज मोर्चा... प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर निगडित विषयांवर सोमवारी सकाळी रासाटी येथील कोयना वन्यजीव कार्यालयावर धरणग्रस्त आंदोलकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण