शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

साताऱ्यातील ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने प्रारंभ, रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल 

By सचिन काकडे | Updated: January 5, 2024 13:51 IST

सातारा : रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सातारा ग्रंथ महोत्सवाच्या चार दिवसाच्या अक्षर समारोहाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ही ...

सातारा : रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या सातारा ग्रंथ महोत्सवाच्या चार दिवसाच्या अक्षर समारोहाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ही ग्रंथदिंडी गांधी मैदानावरून राजपथ मार्गे जिल्हा परिषद मैदानावरील साहित्यिक डॉ. विश्वास मेहंदळे नगरीकडे मार्गस्थ झाली.ग्रंथपालखी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली होती. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा तसेच विविध साहित्य संपदा ठेवण्यात आली होती. अरुण म्हात्रे यांनी श्रीफळ वाढवल्यानंतर ग्रंथ पालखी पुढे मार्गस्थ झाली. यावेळी ‘मराठी साहित्याचा विजय’ असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्या शाळा, रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालय, हिंदवी पब्लिक स्कूल, मोना स्कूल, सुशिलाबाई साळुंखे जुनिअर कॉलेज तसेच न्यू इंग्लिश स्कूल इत्यादी शाळांचे चित्ररथ या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले.कन्या शाळेने ‘अंधश्रद्धा पसरवू नका’ हा उदबोधक संदेश देणारा चित्र रथ सादर केला. रयत शिक्षण संस्थेने सावित्रीबाई फुले यांचा देखावा सादर केला. सुमारे आठशे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कवी अरुण म्हात्रे, ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाहक शिरीष चिटणीस, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूलचे संचालक अमित कुलकर्णी, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र शेजवळ, साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, ज्येष्ठ कला शिक्षक चंद्रकांत ढाणे, समन्वय समितीच्या सुनिता कदम, प्रल्हाद पार्टे, विनायक लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर