शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

व्हेल माशाच्या उलटीचा वनविभाग करणार लिलाव, शासनास कोट्यवधींचा महसूल मिळविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:27 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात माशाच्या उलटीला मोठी किंमत

सातारा : ‘उलटी’ हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी अनेकांना किळस वाटते; पण आपण ज्या उलटीबद्दल बोलतोय ती उलटी व्हेल माशाची आहे. साताऱ्यात व्हेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली खरी. पण आता या उलटीचे पुढे काय केले जाणार, असा नक्कीच अनेकांना प्रश्न पडला असेल. मात्र, ही उलटी नष्ट केली जाणार नसून, त्यातून शासन कोट्यवधींचा महसूल मिळविणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.रत्नागिरीहून चक्क रुग्णवाहिकेतून चाैघेजण व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करत मुंबईला निघाले होते. त्यामध्ये रत्नागिरी पोलिस दलातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचाही समावेश होता. सातारा एलसीबीने ही रुग्णवाहिका महामार्गावर अडविल्यानंतर संबंधित चाैघांकडून व्हेल माशाची पाच किलो उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची तब्बल पाच कोटी किंमत आहे. इतकी माैल्यवान वस्तू असताना आता या उलटीचे नेमके काय केले जाणार, असा प्रश्न साताऱ्यांनाच पडला होता. त्यामुळे ‘लोकमत’ने वनविभाग आणि पोलिसांशी संपर्क साधून यातील कायदेशीर प्रक्रिया जाणून घेतली. ज्या वस्तूचा उपयोग शरीरासाठी हानीकारक नाही. ती वस्तू जर शासन दरबारी जप्त झाली तर त्या वस्तूचा शासन लिलाव करते. त्यातून शासन महसूल मिळवते, अशी एकंदरीत कोणत्याही वस्तूबाबत लिलाव प्रक्रिया असते. याच पद्धतीने व्हेल माशाच्याही उलटीची लिलाव प्रक्रिया होणार आहे. सध्या चारीही संशयित आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. तसेच व्हेल माशाची उलटीही पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर ही उलटी वनविभागाच्या ताब्यात दिली जाणार आहे. न्यायालय आणि शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वनविभाग या उलटीचा लिलाव करणार आहे. हा लिलाव झाल्यास शासनाच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर