शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था

By दीपक शिंदे | Updated: September 7, 2022 17:34 IST

पठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे

पेट्री : जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिराने सुरू होत असून, चालू वर्षीचा हंगाम शनिवार दि. १० सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रतिपर्यटक शंभर रुपये पर्यटन शुल्क व शालेय विद्यार्थ्यांसाठी वीस रुपये शुल्क आकारले जाणार असून ऑनलाईन बुकिंगसाठी संकेतस्थळावर पर्यटकांना नोंदणी करावी लागणार आहे.कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले असून, यावर्षी हंगामासाठी साधारणपणे १५० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे.तसेच पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृह, पिण्यासाठी मिनरल वॉटर याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. कास पठारावर सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर यासह अनेक प्रजातींची फुले फुलायला सुरुवात झाली असून, येत्या एक ते दोन दिवसांत फुलांचे गालिचे तयार व्हायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता कास पठारावरील फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. त्यामुळे हंगाम जरी लांबला असला तरी हा हंगाम पुढे भरपूर काळ टिकणार असल्याचे कास पठार कार्यकारी समितीमधील अनुभवी प्रशिक्षक तसेच वनविभागातील जाणकार व अभ्यासू तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे.

९ सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था...हंगामाबाबत इतर नियोजनाबाबत येत्या ८ सप्टेंबर रोजी वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांची बैठक होणार असून, ९ सप्टेंबरपासून पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच कास पठारावर प्रवेश दिला जाणार असून, जास्तीत जास्त पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करून यावे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन