शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
4
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
5
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
6
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
7
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
8
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
9
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
10
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
11
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
12
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
13
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
14
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
15
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
16
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
17
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
20
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

पाचगणीतील पंचतारांकित द फर्न हॉटेल सील, इमारत रहिवासासाठी असताना केला व्यावसायिक वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 11:40 IST

पाचगणी (जि. सातारा) : पाचगणी येथील एका पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकाने प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून व्यावसायिक वापर केल्याने हे हॉटेल ...

पाचगणी (जि. सातारा) : पाचगणी येथील एका पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकाने प्रशासनाचे नियम पायदळी तुडवून व्यावसायिक वापर केल्याने हे हॉटेल आज पाचगणी नगर पालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाने सयुक्तिक कारवाई करत सील केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.शुक्रवारी दुपारी पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर पाचगणी हद्दीतील हॉटेल फर्नवर पाचगणी नगरपालिका, पाचगणी पोलिस ठाणे, प्रांत अधिकारी, तहसीलदार, महसूल विभाग या सर्वांचे विशेष कारवाई पथक आपल्या लवाजम्यासह दाखल झाले.या हॉटेलच्या बऱ्याच तक्रारी महसूल, पालिका विभागाकडे आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोरच कारवाईसाठी अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यामुळे काय कारवाई होणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या. या सर्व विभागाने दुपारनंतर हॉटेलमधील सर्व पर्यटक ग्राहकांना हॉटेलमधून बाहेर काढले. त्यानंतर कर्मचारी यांनाही बाहेर काढले आणि हॉटेलला सील केले.याबाबत बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, संबंधित हॉटेलला याअगोदर अनेक नोटिसा दिल्या होत्या. संबंधितांना या हॉटेलचा वापर बंद करण्यास सांगितले होते. या इमारतीला रहिवासी वापरासाठी मान्यता होती, परंतु याचा वापर व्यवसायासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने याबद्दलची नोटीस पालिकेने देऊन त्यांची बांधकाम परवानगी रद्द केली होती. परंतु, वापर चालूच राहिल्यामुळे प्रशासनाने हे हॉटेल सील केले आहे.आपण अनेक वेळा संबंधित हॉटेल मालकाला नोटीस दिली होती, परंतु तरीही याचा व्यावसायिक वापर हा चालू होता. हे अनधिकृत असून, माननीय हायकोर्टानेदेखील याला रेगुलर सेशनसाठी अर्ज प्रोसेस करायला आपल्याला सांगितले होते, परंतु संबंधित प्रोसेस न करता व्यावसायिक वापर चालूच राहिल्यामुळे आपण नोटीस देऊन हे हॉटेल आज प्रशासनातर्फे सील केलेले आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhotelहॉटेल