शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९०० कोटींचा मिळणार लाभ !

By नितीन काळेल | Updated: September 7, 2022 17:20 IST

सातारा : राज्य शासनाने नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोर्टलवर माहिती भरली जात आहे. ...

सातारा : राज्य शासनाने नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. तर या निर्णयाचा जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होऊन सुमारे ९०० कोटी रुपये मिळू शकतात.राज्यात पावणे तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी दोन लाखांपर्यंत थकित पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना माफी जाहीर केली होती. त्यानंतर मार्च २०२० मध्ये राज्य शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला. त्यावेळी नियमीत कर्जफेड आणि दोन लाखांवर पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा केली होती. या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आलेले. सुरुवातीच्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत  कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांचे प्रमाणीकरण करुन संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.जिल्ह्यात त्यावेळी ३ लाख ५३ हजार ३०३ शेतकरी पीक कर्ज घेणारे होते. यामधील ३ लाख १ हजार १९५ शेतकरी हे सातारा जिल्हा बँकेचे तर राष्ट्रीयकृत बँकेचे ५१ हजार १०८ कर्जदार होते. त्यावेळी दोन लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या जवळपास ६४ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. या शेतकऱ्यांची सुमारे ४४५ कोटी थकित कर्ज रक्कम होती.प्रोत्साहनचा यांना मिळणार लाभ...आताच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे नियमीत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षातील तीनपैकी दोनवर्षे  शेतकरी थकबाकीदार नसावा अशी अट आहे. ५० हजारांपर्यंत हा लाभ मिळणार आहे. एखाद्या शेतकऱ्यांचे नियमीत पीक कर्ज २५ हजार असेल तर त्याला तेवढीच रक्कम मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार लिंकिंग नाही, त्यांना लाभ दिला जाणार नाही.

नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या या कर्ज योजनेचा लाभ होईल. पात्र शेतकऱ्यांनी थंब इंम्प्रेशन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळू शकतो.  - मनोहर माळी, जिल्हा उपनिबंध

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी